चंद्रपूर :- चंद्रपूर जिल्हा सिटी टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन चंद्रपूर जिल्ह्याच्या वतीने चंद्रपूर येथे जिल्हा स्तरीय सब ज्युनिअर, ज्युनिअर व सिनिअर ( मुले व मुली ) टेनिस बॉल क्रिकेटची निवड चाचणी दिनांक २० ऑगस्ट २०२३ रोजी ठीक सकाळी ११:०० वाजता सरदार पटेल महाविद्यालय, चंद्रपूरच्या मैदानावर घेण्यात आली होती. या निवड चाचणीच्या उदघाटन प्रसंगी उद्घाटक म्हणुन प्रा. डॉ. विजय सोमकुंवर संचालक, शारीरिक शिक्षण व क्रीडा विभाग प्रमुख सरदार पटेल महाविद्यालय, चंद्रपूर व निवड चाचणीचे अध्यक्ष प्रा. डॉ. अनीस अहमद खान संचालक, शारीरिक शिक्षण व क्रीडा विभाग प्रमुख महात्मा गांधी सायन्स कॉलेज, गड़चांदुर व चंद्रपूर जिल्हा सिटी टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन, चंद्रपूरचे सचिव प्रा. विक्की तुळशीराम पेटकर हे उपस्थित होते. सदर जिल्हा स्तरीय टेनिस बॉल क्रिकेटची निवड चाचणीमधे मोठ्या संख्येने खेळाडूंनी सहभाग नोंदविला होता. सदर जिल्हा स्तरीय निवड चाचणीमधे प्रास्ताविक करताना प्रा. विक्की तुळशीराम पेटकर यांनी टेनिस बॉल क्रिकेट या खेळाबाबत संपूर्ण माहिती सर्व खेळाडुंना समजावून सांगितली व निवड चाचणीच्या उदघाटन प्रसंगी उद्घाटक म्हणुन प्रा. डॉ. विजय सोमकुंवर यांनी खेळाडुंना खेळाबद्दलचे महत्व समजावून सांगितले तसेच अध्यक्षीय भाषणात प्रा. डॉ. अनीस अहमद खान यांनी खेळ व खेळाडूवृती याबाबत भाषण केलेत्या नंतर सर्व मान्यवरांच्या हस्ते क्रिकेट मैदानाचे पूजन करून सर्व खेळाडुंना शुभेच्या देऊन निवड चाचणीला सुरुवात करण्यात आली. त्यानंतर निवड समितिद्वारे निवड चाचणीसाठी आलेल्या सर्व टेनिस बॉल क्रिकेट खेळाडूंचे निवड चाचणी घेण्यात आली व निवड झालेला संघ नागपूर येथे दिनांक ०८ ते १० सप्टेंबर २०२३ रोजी १४वी सब ज्युनिअर, १८वी ज्युनिअर व २३वी सिनिअर ( मुले व मुली ) टेनिस बॉल क्रिकेट राज्यस्तरीय अजिंक्यपद स्पर्धेत चंद्रपूर जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहे.
या सदर निवड चाचणीत चंद्रपूर जिल्हा सिटी टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन चंद्रपूरचे सहसचिव सुरज परसूटकर, कोषाध्यक्ष रुचिता आंबेकर, वर्षा घटे तालुका प्रतिनिधित्व व सदस्यगं बंडू डोहे, इंद्रजीत निषाद, सौरभ बोरकर, इखलाख पठान, रिंकेश ठाकरे, आदित्य आंबटकर, ईश्वर पोटर्ला, श्रुती घटे, भाग्यश्री मेश्राम हे उपस्थित होते.