महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत जिल्हास्तरीय मिनी सरस- विक्री प्रदर्शनाचे उद्घाटन संपन्न

गडचिरोली :- उमेद- महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान गडचिरोली अंतर्गत जिल्हा स्तरीय मिनी सरस- विक्री व प्रदर्शन कार्यक्रमाचे उदघाटन 06 मार्च 2025 रोजी करण्यात आले. सदर प्रदर्शनी 06 मार्च ते 10 मार्च 2025 कालावधीत अभिनव लॉन चंद्रपूर रोड, गडचिरोलीचे मैदानामध्ये आयोजित करण्यात आलेला आहे. सदर प्रदर्शनीसाठी गडचिरोली जिल्हयातिल 75 स्वयं सहायता समूह सहभागी झालेले आहेत.

गडचिरोली जिल्हयात उमेद अंतर्गत समुहांची बांधणी झालेली असून महिला सक्षमीकरण होत आहे. उमेद अभियानामुळे महिला समोर येत आहेत. जनसमुदायामध्ये उभे राहून चांगले मार्गदर्शन महिला करू शकतात. अभियानांतर्गत रोजगार तयार केलेल्या वस्तुकरीता मार्केट उपलब्ध करण्याकरीता कार्यक्रम घेण्यात येत आहे. ज्या महिला क्षेत्रभेटी करीता येतात त्यांना सदर वस्तूचे पॅकेजिंग ब्रँडींग व व्यवसाय उभारणी बघून आपण स्थानीक परिस्थीती नुसार काय करू शकतो याचेही नियोजन सदर प्रदर्शनीच्या माध्यमातून होत असल्याचे प्रफुल भोपये जिल्हा अभियान व्यवस्थापक उमेद यांनी प्रास्ताविका मध्ये सांगीतले.

सरस प्रदर्शनी महिलांनी तयार केलेल्या वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचे काम करीत आहे. महिलांनी तयार केलेल्या वस्तु वा पदार्थ हे गाव, तालुका जिल्हा, एवढेच मर्यादित न ठेवता जिल्हयाबाहेर कसे जातील याबाबत जास्तीत जास्त मार्केटींगवर भर देण्याची गरज आहे. सेंद्रीय पदार्थांचे इतर सर्व ठिकाणी मागणी आहे. त्यासाठी मार्केटींग करावे. कुरखेडा येथील सिताफळ प्रकल्प, चातगाव येथील मुरमुरा उद्योग या सारख्या यशोगाथांची व्याप्ती वाढविण्याची गरज आहे. Social Movement च्या माध्यमातून महिलांच्या मागे स्वयंसहाय्यता समूह उभा आहे. असे राजेंद्र एम. भुयार अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प. गडचिरोली यांनी उद्‌घाटक म्हणून संबोधीत केले.

कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून लाभलेले सुहास गाडे, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद गडचिरोली यांनी महिला सक्षमीकरणावर बोलतांना राजकीय, सामाजिक आर्थीक स्वातंत्र्य इ. बाबीवर प्रकाश टाकला. आर्थिक स्वातंत्र्य स्त्रीसाठी महत्वाचे आहे. प्रदर्शनीमध्ये दूर- दूर गावामधून महिला आपले वस्तू विक्री करण्याकरीता येत आहेत. यासारखे विविध उदाहरण देऊन आर्थिक स्वातंत्र्याचे महत्व पटवून दिले. पुर्वीच्या काळी ‘जीच्या हाती पाळण्याची दोरी ती घराची उद्धारी’ अशी म्हण होती. आताच्या काळामध्ये “जिच्या हाती व्यवसायाची दोरी, ती जगाला उद्धारी” अशी म्हण रूजू होत आहे. उमेद ही ग्रामीण भागाकरीता यंत्रणा आहे. ग्रामीण भागातील महिलांनी तयार केलेले प्रोडक्ट राज्य स्तरावर गेले पाहिजे यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याबाबत अध्यक्षीय भाषणामध्ये बोलत होते. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन अशपाक शेख जिल्हा व्यवस्थापक SIIB यांनी केले.

वस्तुंची खरेदी करुन महिलांना प्रोत्साहन दयावे-

ग्रामिण भागातील महीलांनी बचत गटांच्या माध्यमातून उत्पादित केलेल्या वस्तुंना बाजारपेठ उपलब्ध होण्यासाठी जिल्हा स्तरीय मिनी सरस महोत्सव प्रदर्शन व विक्रीसाठी दिनांक 06 ते 12 मार्च 2025 कालावधीत आयोजन करण्यात आलेले आहे. सर्वानी भेट देवून महिलांना प्रोत्साहण द्यावे. असे आवाहन सुहास गाडे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद गडचिरोली यांनी केले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना आधार सीडिंग अनिवार्य

Sat Mar 8 , 2025
यवतमाळ :- संजय गांधी निराधार अनुदान योजना आणि श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेंतर्गत लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांना आधार सीडिंग करणे अनिवार्य करण्यात आले आहे. त्यामुळे ज्यांचे सिडींग झाले नसतील त्यांनी करून घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. योजनेचा लाभ थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होण्यासाठी ‘आधार सीडिंग’ आवश्यक आहे. त्यामुळे ज्या लाभार्थ्यांनी अद्याप आपले आधार कार्ड बँक खात्याशी लिंक केलेले नाही, […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!