आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते बक्षीस वितरण
हौशी जिल्हा कबड्डी असोसिएशन चंद्रपूर, आदर्श विद्यार्थी क्रीडा मंडळ चंद्रपूर व नगरसेवक संजय कंचर्लावार यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन
चंद्रपूर – कामगार नेते, माजी नगराध्यक्ष स्व. रमेशभाऊ कोतपल्लीवार यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात राष्ट्रसंत तुकडोजी इंदिरानगर क्रीडा मंडळाने पुरुष गटात विजेतेपद, तर महिला गटात श्रीराम वार्ड बल्लारपूर या क्रीडा चमूने विजेतेपद पटकावले.
विजेत्या आणि उपविजेत्या खेळाडूंना लोकलेखा समितीचे अध्यक्ष आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. भानापेठ प्रभागातील आदर्श विद्यार्थी क्रीडा मंडळाच्या पटांगणावर झालेल्या स्पर्धेचा समारोपीय सोहळा रविवारी रात्रीच्या सुमारास पार पडला. यावेळी कार्यक्रमाला महापौर राखीताई संजय कंचर्लावार, भाजपचे जिल्हाध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे, सभागृह नेते देवानंद वाढई, महिला व बालकल्याण समिती उपसभापती शितल कुळमेथे, भाजपचे कोषाध्यक्ष प्रकाश धारणे, नगरसेवक संजय कंचर्लावार यांची उपस्थिती होती.
हौशी जिल्हा कबड्डी असोसिएशन चंद्रपूर, आदर्श विद्यार्थी क्रीडा मंडळ चंद्रपूर व नगरसेवक संजय कंचर्लावार यांच्या संयुक्त विद्यमाने आदर्श विद्यार्थी क्रीडा मंडळ अंचलेश्वर वॉर्ड येथे आयोजित जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धांमध्ये जिल्ह्यातून विविध चमुनी सहभाग घेतला होता.
पुरुष गटातील विजेत्या संघाला वीस हजार रुपये आणि स्मृतिचिन्ह आणि उपविजेत्या चमूला पंधरा हजार रुपये आणि स्मृतिचिन्ह, तर महिला गटात विजेत्या संघाला दहा हजार रुपये आणि उपविजेत्या संघाला सात हजार रुपयांचे पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले. याशिवाय वैयक्तिक बक्षीसात स्वप्नील कोडापे, निखिता डंभारे यांना मॅन ऑफ द टूर्नामेंट म्हणून सायकल भेट देण्यात आली. बक्षीस वितरण सोहळ्याचे संचालन धनंजय तावाडे यांनी केले.
स्पर्धेच्या आयोजनाकरिता आदर्श विद्यार्थी क्रीडा मंडळ अध्यक्ष महादेव कुंभारे, सचिव विजय खाडीलकर, उपाध्यक्ष अशोक पेटकर, उपाध्यक्ष प्रशांत मेश्राम सहसचिव विक्की पेटकर, कोषाध्यक्ष सुभाष देवीकर, सल्लागार सुनिल झोडे, जीवन नंदनवार, गणेश जांभुळकर, सज्जु कुरेशी, सागर हांडे, गुड्डू शेडमाके, अंकित रामटेके, रूदेश नागपूरे, छोटु बावणे, भारत खाडीलकर, हर्षद क्षिरसागर, प्रदिप देविकर, आकाश रामटेके, कैलास कामतवार, अश्विन कायरकर, वैभव बडवाईक, नागेय नागपूरे, निखिल मेश्राम, सुरेश कुंभारे, धनंजय तावाडे, अतुल खाडीलकर, श्रीकांत कावडे, प्रणय मासरकर, मयुर शास्त्रकार, किशोर पंधरे, पतीराम मोटघरे, अभिनव रामटेके, मनोज कामतवार, महिला मंडळ सदस्य प्रतीमा देविकर, भारती कायरकर, चित्रा कुंभारे, पल्लवी कुभारे, छाया ताडासे, छाया चट्टे, गिता खाडीलकर, अनिता खाडीलकर, पुष्पा खाडीलकर, विद्या झोडे, सारिका कामतवार यांनी सहकार्य केले.
डॉ. मंगेश गुलवाडे यांचा सत्कार
हैदराबाद येथील मॅरॅथॉन स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल डॉ. मंगेश गुलवाडे यांचा आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
दिनेश दमाहे
9370868686
dineshdamahe86@gmail.com