चंद्रपूर येथे जिल्हा स्तरीय ज्युनिअर व सिनिअर ( मुले व मुली ) टेनिस बॉल क्रिकेटची निवड चाचणी 2024

चंद्रपूर :- विदर्भ टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनच्या पत्रानुसार चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व ज्युनिअर व सिनिअर ( मुले व मुली ) खेळाडूंना कळविण्यात येते कि, 19 वी ज्युनिअर व 24 वी सिनिअर ( मुले व मुली ) टेनिस बॉल क्रिकेट राज्यस्तरीय अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन 28 ते 30 सप्टेंबर 2024 दरम्यान नागपूर येथे आयोजित करण्यात येत आहे. सदर स्पर्धेत चंद्रपूर जिल्हा व सिटीचा संघ सहभाग करण्याकरिता चंद्रपूर जिल्हा सिटी टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन, चंद्रपूर जिल्ह्याची निवड चाचणी रविवार दिनांक 15 सप्टेंबर 2024 रोजी ठीक सकाळी 11:00 वाजता सरदार पटेल महाविद्यालय, चंद्रपूरच्या मैदानावर घेण्यात येत आहे.

चंद्रपूर जिल्हा सिटी टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन, चंद्रपूरचे अध्यक्ष डॉ. अनिस अहमद खान, व सचिव प्रा. विक्की तुळशीराम पेटकर यांच्या उपस्थितीत निवड समितीद्वारा निवड चाचणी घेण्यात येणार आहे. उत्कृष्ठ खेळाचे प्रदर्शन करणाऱ्या मुले व मुली खेळाडूंचे चंद्रपूर जिल्हा सिटी टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन, चंद्रपूरच्या संघात निवड केली जाईल व निवड झालेला संघ नागपूर येथे दिनांक 28 ते 30 सप्टेंबर 2024 रोजी चंद्रपूर जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार.

तरी इच्छूक खेळाडूंनी सुरज परसूटकर (8669075173), बंडू डोहे (7066666105), हर्षल क्षिरसागर (706691570), ईश्वर पोर्थला (7755908124), मनोज डे (9604320915), इखलाख पठान (9834307243), राकेश ठावरी (8551976156), चंदन परसुटकर (9970770132), रिंकेश ठाकरे ( 8007172073), रुचिता आंबेकर (8552925066) यांच्याशी संपर्क साधावा.

निवड चाचणीचे नियम

01) U-19 वर्षांसाठी 01 / 10 / 2005 किंवा त्या नंतरचा जन्म असावा.

02) खेळाडूने आधार कार्डची 03 प्रत झेरॉक्स व 03 पासपोर्ट फोटो सोबत आणणे अनिवार्य आहे

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

ऊर्जामंत्री यांनी घेतली वीज कंत्राटी कामगार संघाची मीटिंग

Wed Sep 11 , 2024
– वीज ऊद्योगातील कंत्राटी कामगारांना मिळणार 19% वेतन वाढ जाहीर, महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाच्या वतीने स्वागत मुंबई :- महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघ संलग्न भारतीय मजदूर संघाच्या विविध मागण्यांच्या पार्श्वभूमीवर राज्याचे ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील सह्याद्री शासकीय निवासस्थानी महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाची मीटिंग घेतली या वेळी वीज ऊद्योगातील कंत्राटी कामगारांना 19% वेतन वाढ फरकासह देण्यात येण्यात येणार […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!