जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जिल्हास्तरीय मुख्यमंत्री सचिवालय कक्ष

गडचिरोली : राज्यातील सर्वसामान्य जनतेचे दैनंदिन प्रश्न, शासन स्तरावर असलेली कामे, त्यासंदर्भात प्राप्त होणारे अर्ज, निवेदने, संदर्भ मुख्यमंत्री सचिवालय कक्ष, मंत्रालय,मुंबई येथे स्विकारुन त्यावर कार्यवाही करण्याकरीता संबंधित क्षेत्रीय स्तरावरील शासकीय यंत्रणेकडे उचित कार्यवाहीसाठी पाठविण्यात येतात. मात्र, यामध्ये अधिक लोकाभिमुखता, पारदर्शकता व गतिमानता आणण्याच्या अनुषंगाने विभागीय आयुक्त कार्यालयांमध्ये मुख्यमंत्री सचिवालय कक्षाचे क्षेत्रीय कार्यालय स्थापन करण्यात आलेले आहे. सदर कक्षामार्फत सर्वसामान्य जनतेचे दैनंदिन प्रश्न, शासन स्तरावर असलेली कामे व त्यासंदर्भात प्राप्त होणारे अर्ज, निवेदने इत्यादीवर कार्यवाही करण्यात येत आहे. सदर कार्यवाहीमध्ये अधिकाधिक व प्रभावीपणे लोकाभिमुखता, पारदर्शकता व गतिमानता आणण्याच्या अनुषंगाने त्याचप्रमाणे ग्रामीण भागातील नागरिकांचे प्रलंबित प्रश्न तातडीने सोडवून परिणामकारक निपटारा होण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यांच्या जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये मुख्यमंत्री सचिवालय कक्षाचे क्षेत्रीय कार्यालय सुरू करण्यात आले आहे.

जिल्ह्यामधील सर्वसामान्य जनतेचे दैनंदिन प्रश्न, शासन स्तरावर असलेली कामे, त्यासंदर्भात प्राप्त होणारे अर्ज, निवेदने, संदर्भ हे मुख्यमंत्री सचिवालय कक्ष, मंत्रालय,मुंबई येथे न देता सदर अर्ज जिल्हाधिकारी कार्यालय, गडचिरोली येथे देण्याकरीता स्वंतत्र कक्ष स्थापन करण्यात आलेले आहे. सदर कक्षामध्ये निवासी उपजिल्हाधिकारी यांना “पदसिद्ध विशेष कार्य अधिकारी” म्हणून नेमण्यात आलेले आहे.

तरी गडचिरोली जिल्ह्यामधील सर्व नागरीकांनी मुख्यमंत्री महोदयांना सादर करावयाचे जिल्ह्यामधील सर्वसामान्य जनतेचे दैनंदिन प्रश्न, शासन स्तरावर असलेली कामे, त्यासंदर्भात प्राप्त होणारे अर्ज, निवेदने, संदर्भ हे मुख्यमंत्री सचिवालय कक्ष, मंत्रालय,मुंबई येथे न देता सदर अर्ज जिल्हाधिकारी कार्यालय,गडचिरोली येथील स्थापन करण्यात आलेल्या “मुख्यमंत्री सचिवालय कक्षामध्ये” देण्यात यावे,असे आवाहन समाधान शेंडगे,निवासी उपजिल्हाधिकारी तथा पदसिध्द विशेष कार्य अधिकारी (मुख्यमंत्री सचिवालय कक्ष), जिल्हाधिकारी कार्यालय,गडचिरोली यांनी केलेले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

प्रवाशांच्या डोळ्यांदेखत महिला गेली रेल्वेखाली

Tue Feb 7 , 2023
– धावत्या रेल्वेत बसण्याच्या नादात गेला जीव – हृदयाचा थरकाप उडविणारी घटना नागपूर :-मुलींसाठी खाद्यपदार्थ घेऊन ती धावत्या रेल्वेत चढण्याच्या प्रयत्नात होती… लोखंडी दांड्यावरून हाताची पकड सैल झाली… अन् ती चक्क फलाट आणि रेल्वे गाडीच्या मधातील गॅपमध्ये खाली गेली… ‘धावाऽ वाचवाऽऽ ती गेलीऽऽऽ’ अशी एकच आरडाओरड झाली. मात्र, गाडी थांबेपर्यंत तिच्या कवटीला चांगलीच जखम झाली होती. प्रचंड रक्तस्राव झाला अन् […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!