मनपातर्फे अंबाझरी, फुटाळा तलाव येथे छठ पूजेची व्यवस्था

नागपूर :- उत्तर भारतीयांचा धार्मिक उत्सव छठ पूजा नागपुरात हर्षोल्हासात साजरा केला जातो. यासाठी अंबाझरी आणि फुटाळा तलाव येथे मोठ्या संख्येने भाविक एकत्रित येतात. भाविकांसाठी दरवर्षी नागपूर महानगरपालिकेच्या वतीने सोयी सुविधा पुरविण्यात येतात व सुरक्षेच्या दृष्टीने तयारी करण्यात येते. यावर्षी ३० आणि ३१ ऑक्टोबर रोजी साजरा करण्यात येणाऱ्या उत्सवानिमित्त करण्यात येणाऱ्या व्यवस्थेची पाहणी धरमपेठ झोनचे सहायक आयुक्त प्रकाश वराडे यांनी केले.यावेळी माजी महापौर दयाशंकर तिवारी आणि विविध संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. दरवर्षी मोठ्या संख्येने येथून भाविक सूर्य देवता ला अर्ध्य देतात. महानगरपालिकेच्या सहयोगाने सदर आयोजन करण्यात येते. हजारोंच्या संख्येने येणाऱ्या भाविकांना त्रास होऊ नये याची काळजी मनपाच्या वतीने घेण्यात येते.

पावसामुळे अंबाझरी तलाव परिसरात मोठ्या प्रमाणात गवत वाढले आहे. ते गवत कापण्यात यावे, बर्रीकॅडींग करण्यात यावे, विद्युत व्यवस्था करण्यात यावी तसेच साऊंड ची व्यवस्था करावी असे निर्देश देण्यात आले. भाविकांना सोयीचे व्हावे यासाठी तलावापर्यंत येण्यासाठी सुरक्षित रस्ता तयार करण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले. तसेच फुटाळा तलावावरही भाविकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने संपूर्ण व्यवस्था करण्याचे निर्देश प्रकाश वराडे यांनी दिलेत. यावेळी मनपा चे अमोल चोरपगार, विजय गुरुबक्षणी, संजय पांडे, सुरेंद्र पांडे, सत्येंद्र प्रसाद सिंग, विजय तिवारी, ब्रजभूषण शुक्ला, प्रा. बद्रीप्रसाद पांडे, मुकेश मिश्रा, प्रशांत गौर, सचिन शुक्ल, ओमप्रकाश पांडे, राजेश शुक्ला, अविनाश प्रधान, मनोज तथा आकाश यादव उपस्थित होते.

Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com