जिल्हा उद्योग मित्र सभा संपन्न

भंडारा :- जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा उद्योग मित्र सभा आयोजित करण्यात आली. या सभेला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी समिर कुर्तकोटी, अति.जिल्हाधिकारी श्रीपती मोरे, इतर विभागाचे अधिकारी व जिल्ह्यातील उद्योजक उपस्थित होते.

जिल्हयातील मे. अशोका ले-लॅन्ड व मे. सनफलॅग लि. या उद्योगांनी त्यांचे उद्योगांकडून निर्मित होणाऱ्या उत्पादनाबाबत व भविष्यात होणाऱ्या नियोजनाबाबत सादरीकरण केले. त्यांना लागणाऱ्या आवश्यक पार्टस करीता छोटया उद्योगांकडून निर्मितीचे संभावने बाबत सांगीतले त्यातुन जिल्हयात रोजगार निर्मितीस चालना मिळेल.

या सभेत भंडारा ब्रास क्लस्टर, माऊली अगरबत्ती क्लस्टर व मँगनिज ओर डिलर्स असोसिएशन यांचे प्रतिनिधींनी अनुक्रमे भंडारा, लाखनी व तुमसर या तालुक्यांमध्ये उद्योग समुह स्थापन करण्याबाबत सुरू असलेल्या कार्यवाही विषयी माहीती दिली. जिल्हाधिकारी कुंभेजकर यांनी सदर उद्योग समुह जिल्हयात स्थापन झाल्यास उत्पादन गुणवत्तावाढी सोबतच रोजगार निर्मितीस चालना मिळेल असे प्रतिपादन केले. तसेच उद्योगांना येणाऱ्या विविध अडचणींबाबत निराकरण करण्याचे निर्देश संबधित विभागांना दिले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

पावसाने वाढला गारवा

Wed Nov 29 , 2023
बेला :- मंगळवारला सकाळी झालेल्या पावसामुळे वातावरणात थंडीचा गारवा वाढला. त्यामुळे रात्री घातलेले स्वेटर व कानावरील उबदार वस्त्र लोकांनी दिवसभर काढलेच नाही. अवकाळी पडलेल्या पावसाने शेतकऱ्यांचा शेतातील झाडाच्या बोंडावरील कापूस ओला झाला. त्यामध्ये नुकसान होण्याची शक्यता वर्तवली जाते. झोप झाल्यानंतर सकाळपासून वातावरणात अनपेक्षितपणे हवामान बदल झाला. आणि हळूहळू सुरू झालेला पाऊस दुपारी बारा वाजेपर्यंत वाढत गेला. त्यामुळे आवागमन व जनजीवन […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com