नागपूर :- भारत निवडणूक आयोग्याच्या निर्देशानुसार लोकसभा सार्वत्रिक निवडणूक खर्चावर देखरेखीसाठी जिल्हा तक्रार समिती गठीत करण्यात आली आहे.
या समितीच्या अध्यक्ष जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा असून नागपूर व रामटेक मतदार संघाचे खर्च संनियंत्रण कक्षाचे नोडल अधिकारी विलीन खडसे व सिमा नन्होरे सदस्य सचिव आहेत. वरिष्ठ कोषागार अधिकारी समितीचे सदस्य आहेत.
तक्रारीच्या अनुषंगाने रामटेक लोकसभा मतदार संघासाठी नोडल अधिकारी सिमा नन्होरे मो.क्र. 9404834043 व नागपूर लोकसभा मतदार संघासाठी नोडल अधिकारी विलीन खडसे मो.क्र. 8446247686 यांच्याशी नागरिकांनी संपर्क साधावा.