ध्वजनिधी संकलनासाठी जिल्हाधिकाऱ्यांचा पालकमंत्र्यांच्याहस्ते गौरव

यवतमाळ :- ध्वजदिन निधी संकलनात यवतमाळ जिल्ह्याने उत्तम काम केले आहे. त्यासाठी यापुर्वी जिल्हाधिकारी डॅा.पंकज आशिया यांना मुंबई येथे राज्यपालांच्या हस्ते गौरविण्यात आले आहे. सैनिक कल्याण संचालकांकडून प्राप्त स्मृतिचिन्ह देऊन जिल्हाधिकाऱ्यांना प्रजासत्ताकदिनी पालकमंत्री संजय राठोड यांच्याहस्ते देखील गौरविण्यात आले.

समता मैदानात स्मृतिचिन्ह देण्यात आले. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की, जिल्हा पोलिस अधीक्षक कुमार चिंता, उपवनसंरक्षक धनंजय वायभासे, अप्पर जिल्हाधिकारी अनिल खंडागळे, निवासी उपजिल्हाधिकारी श्रीकांत उंबरकर आदी उपस्थित होते. सन 2023 या आर्थिक वर्षात राज्य शासनाच्यावतीने जिल्ह्याला 59 लाख 68 हजार रुपयांचे ध्वजदिन निधी संकलनाचे उद्दिष्ट देण्यात आले होते.

सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलन समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी डॅा.आशिया यांच्या प्रयत्नाने यावर्षी तब्बल 88 लाख 83 हजार इतके निधी संकलन करण्यात आले. संकलनाची टक्केवारी 149 टक्के इतकी आहे. या उत्तम कामासाठी दि.7 डिसेंबर रोजी राजभवन, मुंबई येथे राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांच्या हस्ते जिल्हाधिकारी व जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांना स्मतिचिन्ह व व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले आहे.

निधी संकलनाच्या उत्तम कामासाठी सैनिक कल्याण विभागाच्या संचालकांकडून प्राप्त स्मृतिचिन्ह प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधत पालकमंत्री संजय राठोड यांच्याहस्ते जिल्हाधिकारी डॅा.आशिया यांना प्रदान करण्यात आले. याच कामासाठी पालकमंत्र्यांच्याहस्ते प्रभारी जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी सुदर्शन गायकवाड व सहाय्यक जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी बालाजी शेंडगे यांना देखील स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

योगासन मध्ये अमित, युनिटी स्पोर्ट्स अजिंक्य - खासदार क्रीडा महोत्सव योगासन स्पर्धा

Fri Jan 31 , 2025
नागपूर :- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या खासदार क्रीडा महोत्सवातील योगासन स्पर्धेमध्ये अमित स्पोर्ट्स असोसिएशन आणि युनिटी स्पोर्ट्स असोसिएशनने अजिंक्यपद प्राप्त केले. मुले आणि मुलींच्या गटात दोन्ही संघांनी सर्वोत्कृष्ट प्रदर्शनातून यश मिळविले. रेशीमबाग येथील कविवर्य सुरेश भट सभागृहामध्ये ही स्पर्धा पार पडली. मुलांच्या गटात सर्वाधिक ३५ गुण प्राप्त करुन अमित स्पोर्ट्स अकादमीने प्रथम क्रमांक पटकाविला. तर २५ […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!