आज जिल्हा कृषी महोत्सवाचा शुभारंभ

Ø विविध 200 स्टॉलच्या माध्यमातून विक्री

Ø कृषी परिसवादाकरिता दालन

नागपूर : पाच दिवसीय जिल्हा कृषी महोत्सवाचा शुभारंभ आज 4 जानेवारीला सकाळी 11 वाजता डॉ. पंजाबरावदेशमुख कृषी विद्यापीठ पद्व्युत्तर वसतिगृह, क्रिम्स हॉस्पीटलच्यासमोर रामदास पेठ येथे होत आहे. या महोत्सवात कृषी व संलग्न परिसवादाकरिता दालन करण्यात आले आहे. हे परिसंवाद दुसऱ्या व चौथ्या दिवशी होणार आहेत. त्यासोबतच महोत्सवामध्ये एकूण 200स्टॉलचा राहणार आहेत. उद्यापासून सुरु होणाऱ्या कृषी महोत्सवास नागरिकांनी एकदा भेट द्यावी, असे आवाहन असे आवाहन कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणेच्या (आत्मा) प्रकल्प संचालक डॉ. नलिनी भोयर यांनी केले आहे.

200 स्टॉलमध्ये कृषी विद्यापीठ कृषी विज्ञान केंद्र, सीसीआरआय, सी. आय. सी. आर.- 5, कृषी तंत्रज्ञान दालने 25 शासकीय विभागांची दालने 20, धान्य फळे भाजीपाला विक्री दालने-60, गृहपयोगी वस्तु विक्री दालने 30, खाद्यपदार्थ दालने 10, सेंद्रीय शेतमाल दालन- 20, खासगी, सार्वजनिक निविष्ठा उत्पादकांचे दालनआदी स्टॉल लावण्यात येणार आहे. या दालनामध्ये प्रात्यक्षिके, कृषी विज्ञानपीठे, कृषी व कृषी संलग्न, कृषी विज्ञान केंद्र, संबंधित विविध कृषी महामंडळे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, जिल्हा अग्रणी बँक, नाबार्ड, महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळ भारत संचार निगम लिमिटेड., जिल्हा परिषद, संशोधन संस्था, शासकीय यंत्रणाबरोबरच खाजगी कंपन्या, उद्योगक, बचत गट, शेतकरी उत्पादक कंपन्या आदीचा स्टॉलचा समावेश आहे.

या महोत्सवात प्रामुख्याने 1 हजार क्विंटल तांदूळ आणि इतर शेतमाल जसे हरभरा, डाळ, ज्वारी, तीळ, उडीद, वाटाणा, गुळ, हळद, मिरची पावडर, मसाले व भाजीपाला आदी शेतकऱ्यांनी पिकविलेला माल विक्रीसाठी उपलब्ध राहणार आहे.

यावर्षी धान्य महोत्सवामध्ये एकूण 100 शेतकरी व शेतकरी गटामार्फत लावण्यात आलेले आहे. शेतकरी गटांनी उत्पादीत केलेला तांदूळ, तूर दाळ, गहू, तीळ, ज्वारी, मसाले, भाजीपाला, फळे इत्यादी आकर्षक पॅकींगमध्ये उपलब्ध आहे. सेंद्रिय शेती अंतर्गत उत्पादित सर्व शेतमाल नागपूर आरगनिक गोडयूस सिस्टीम (NOEPS) या ब्रँडखाली विक्रीकरीता उपलब्ध होणार आहे. आत्मा अंतर्गत पार्वती या सुगंधीत वाणाचे सेंद्रिय पध्दतीने उत्पादन करण्यात आलेले असून मागील वर्षी महोत्सवात भरपूर प्रतिसाद मिळाल्यामूळे या महोत्सवात विक्रीकरीता उपलब्ध होणार आहे.

पाचवा दिवशी शेतकरी सन्मान समारंभ व समारोप सोहळ्यात उत्कृष्ट शेतकऱ्यांबरोबरच कृषी व संलग्न क्षेत्रात उल्लेखनीय कामगीरी करणाऱ्या शेतकरी, शेतकरी गट संस्थायांचा प्रशस्तीपत्र व स्मृतीचिन्ह देवून सन्मान करण्यात येणार आहे. या महोत्सवास नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन कृषी विभागातर्फे करण्यात आले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

4 MAH NAVAL UNIT NCC, NAGPUR ORGANISES AWARENESS CAMPAIGN FOR WOMEN

Wed Jan 4 , 2023
NAGPUR :- On 192nd birth anniversary of Late Smt Savitri Bai Phule, 4 Mah Naval Unit NCC, Nagpur organised awareness campaign for women living on streets, roadside & temporary settlements about menstruation cycle, menstrual hygiene, women hygiene & health and breast cancer. Cadets & officials participated in the event covering minor & major communities near Mankapur Stadium, Yashwant Stadium & […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com