गडचिरोली : छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात निवासी उपजिल्हाधिकारी समाधान शेंडगे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करुन अभिवादन केले. यानंतर राज्यगीताचे गायन करुन सांस्कृतीक कार्यक्रम, व्याख्याने आयोजित करण्यात आली होती.
यावेळी नायब तहसीलदार चिलमवार, नायब तहसीलदार एस बी धकाते ,जिल्हा नाझर आशिष सोरते, अव्वल कारकून विवेक दुधबळे, अव्वल कारकून पियुष आखाडे ,विठ्ठल चहांदे, आदी उपस्थित होते. उपस्थित सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करुन अभिवादन केले.