श्रीराम नगर येथील बुद्धविहाराच्या समस्या व सौंदर्य करणाची मागणीचे निवेदन
नागपुर :- मोरया फाउंडेशन तर्फे दरवर्षी उन्हाळ्यात पक्षा साठी जल पात्र वितरीत करण्यात येते. या वर्षी हा कार्यक्रम रमाई बुद्धविहार श्रीराम नगर येथे आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून दक्षिण चे आमदार मोहन मते यांची उपस्थिती होती. यावेळी रमाई बुद्ध विहार परीसरातील समस्या आणि सौंदर्यीकरणाचा मुद्दा नागरिकांच्या वतीने मोरया फाउंडेशनच्या संस्थापिका रजनी चौहाण यांनी आमदारांना सांगितले. आणि वस्तीतील नागरिकांच्या स्वाक्षरी असलेले निवेदन देण्यात चव्हाण यांनी पुढाकार घेतला. जलपात्र वितरणाच्या कार्यक्रमाला माजी नगरसेवक राजु नागुलवार, शिवसेना (उद्धव ठाकरे,) शहर उपप्रमुख मुकेश रेवतकर, मोरया फाउंडेशनचे अध्यक्ष अविनाश चौहाण आणी समस्त नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रजनी चौहाण यांनी केले तर आभार प्रदर्शन मेघा गणवीर यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी माधुरी इट्टेडवार, स्विटी मांडवगडे, सरीता कांबळे, मंमता, शुभांगी, वैशाली, प्रज्ञा, प्रेरणा , मंदा, रिंकी, रोशनी, सुषमा, दिपाली, अलका,आदींचे सहकार्य लाभले.