प्रभाग 15 तील दिव्यांग लाभार्थीनां युडीआय कार्ड चे वितरण

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी प्रतिनिधी १७ मे — प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या राजनैतिक जीवनाला नुकतेच 20 वर्ष पूर्ण झाले हा समारोह भाजपा द्वारा लाभार्थी सन्मान दिवस म्हणून साजरा करण्यात येत आहे
या अंतर्गत कामठी प्रभाग 15 तील ९ दिव्यांग लाभार्थी रमानगर निवासी भुमेश्वरी मनोज राऊत,आंनदनगर निवासी अमित भविंद्र बर्वे,सैलाबनगर निवासी कमरूनिसा शेख जाफर,सैलाब नगर निवासी शेख इस्माईल शेख रहीम,चित्तरंजन नगर निवासी अमोल निरंजन आगरे, आनंद नगर निवासी प्रणय सुनील चव्हाण,रामगाढ निवासी शौर्य मनिष बागडे,गौतम नगर छावणी निवासी नंदु रामदास सवाईथुल यांना नुकतेच भारत सरकार च्या केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय च्या वतीने युनिक डिसेबिलिटी आयडेंटीफिकेशन नंबर चे डिजिटल कार्ड भाजपा कामठी शहर महामंत्री उज्वल रायबोले यांनी प्रदान केले गया यावेळी प्रभाग 14 चे पुर्व नगरसेवक लालसिंग यादव उपस्थित होते प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या
दूरदृष्टी च्या निर्णयामुळे देश भरातील सर्वच दिव्यांगानां युनिक डिसेबिलिटी आयडेंटीफिकेशन नंबर चे डिजिटल कार्ड देण्यात येत आहे,कार्ड च्या आधारे कोणताही दिव्यांग देशातील कोणत्याही भागात विविध सरकारी योजनांचा लाभ घेऊ शकतात.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

वैशाख बुद्ध पोर्णिमेचा दिवस हा जगातील समस्त बौद्ध अनुयायांसाठी सर्वात महत्वाचा व मंगलमय दिवस आहे-पालकमंत्री नितीन राऊत

Tue May 17 , 2022
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी कामठी ता प्र 17:- तथागत गौतम बुद्धाचा जन्म, त्यांची बुद्धत्व प्राप्ती व त्यांचे महापरिनिर्वाण या घटना वैशाख बुद्ध पौर्णिमेला घडलेल्या आहेत.त्यामुळे वैशाख पौर्णिमेचा दिवस हा जगातील सर्व बौद्ध अनुयायांसाठी सर्वात महत्वाचा व मंगलमय असा दिवस असल्याचे मौलिक वक्तव्य कार्यक्रमाचे अध्यक्ष राज्याचे ऊर्जामंत्री व नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री  नितीन राऊत यांनी केले तसेच या पौर्णिमेच्या दिवशी सिद्धार्थ गौतम […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com