किशोर कन्हेरे यांच्या वाढदिवसा निमित्य गरजु महिलांना शिलाई मशीनचे वाटप. 

नागपूर :- दिनांक 21 नोव्हेम्बर 2022 ला किशोर कन्हेरे शिवसेना प्रवक्ता व नागपूर सुधार प्रन्यासचे माजी विश्वस्त यांचा वाढदिवस त्रिमूर्तीनगर येथे साजरा करण्यात आला. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून माजी आमदार गिरीश गांधी, आमदार विकास ठाकरे, शिवसेना जिल्हा प्रमुख राजू हरणे, शैल जेमिनी, नितीन तिवारी, चंद्रहास राऊत, निलेश खांडेकर, एजाज खान, संतोष सिंग, प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

प्रमुख पाहुण्यांचे हस्ते किशोर कन्हेरे यांचा शाल, श्री फळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. प्रमुख अतिथी गिरीश गांधी यांनी मनोगत व्यक्त करतांना किशोर कन्हेरे यांनी केलेल्या कामाचा गौरव केला व आणखी जोमाने समाजकार्य करण्याचे सांगून पुढील भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. आमदार विकास ठाकरे, राजू हरणे, शैल जेमिनी यांनी सुद्धा उज्वल भविष्याचा शुभेच्छा दिल्या.

प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते गरजु महिलांना शिलाई मशीनचे वाटप  शीतल जावळे, सविता देवगडे, छाया गायकवाड, किरण चौरागडे, माधुरी वाडीधरे यांना करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन विजय नाडेकर व प्रास्ताविक श्याम चौधरी यांनी केले. कार्यक्रमाला प्रामुख्याने अंकित कन्हेरे, रमेश फुले, गजानन चकोले, अरविंद सांदेकर,अल्का कांबळे, ऋषी कारोंडे, माजी नगरसेवक मनोज गावंडे, शिव भेंडे, मिलिंद येवले, सिद्धू कोमजवार, राजेश ओझा, रमेश गिरडकर, पुरुशोतम वाडीधरे,  वनिता लांडगे, भाग्यश्री माथानकर, मुन्ना तिवारी, दशरथ तालेवार, समीर वानखेडे, राजेश कुंभलकर, जगदीश वानखेडे, रमेश चुरणकर, उमेश डेकाटे, दीपक काळभांडे, श्याम नाडेकर गुरुजी, अरविंद लोखंडे, पंकज नेरकर, रेखा कृपाले, हनिफ राहत, नाना लोखंडे, शैलेश मानकर, गिरीधर मुरोडिया, हरिहर कन्हेरे, अजय महादूरे, डा. राजदासानी, अभिजित कोल्हारकर, संजय बोकाडे प्रतीक आर्य, नरेंद्र आगलावे, हितेश यादव, शंकर घोडसे, संमपदा शेंडे, रोहिणी ठाकरे, सुनील कन्हेरे, जितेंद्र मगर, अविनाश मस्के, आदित्य गुप्ता, आशिष कापसे, अक्षय अनकर मोठया संख्येने नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन कन्हेरे फाउंडेशन व मित्र परिवार वतीने करण्यात आले.

 

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

‘अमृत महाआवास अभियान 2022-23’ मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत 24 नोव्हेंबरला मुंबईत राज्यस्तरीय शुभारंभ

Wed Nov 23 , 2022
मुंबई :- भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून महाराष्ट्रात 20 नोव्हेंबर, 2022 रोजीच्या राष्ट्रीय आवास दिनापासून ते 31 मार्च 2023 या कालावधीत ‘अमृत महाआवास अभियान 2022-23’ राबविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या अभियानाचा राज्यस्तरीय शुभारंभ व महाआवास अभियान पुरस्काचे वितरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विधानसभा अध्यक्ष ॲड.राहुल नार्वेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत 24 नोव्हेंबर, […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com