संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी ता प्र 19- अमरावतीच्या ॲड. यशोमती ठाकूर ( मंत्री महिला व बाल विकास महाराष्ट्र शासन) यांच्या वाढदिवसा निमित्त बुधवार दिनांक १८ मे २०२२ रोजी युवा जनकल्याण मित्र परिवारा तर्फे कामठी येथील कस्तुरचंद डागा बाल सदन येथे चिमुकल्या अनाथ मुलांना नोटबुक,पेन,फळ,खाऊ आदी साहित्याचे वाटप करण्यात आले.
ॲड. यशोमती ठाकूर ह्या सुपरिचित व्यक्तिमत्त्वाच्या धनी असून त्यांची लोकप्रियता जिल्ह्याच्या बाहेर संपूर्ण महाराष्ट्रात पसरली आहे. त्यामुळेच वाढदिवसाचे निमित्त करून त्यांच्या कार्यकर्त्यांनी चिमुकल्यांच्या ओठी हास्य फुलवले.
यावेळी ठाकूर यांचा वाढदिवस केक कापून साजरा करण्यात आला. या प्रसंगी पी. एस. लोटे (अधिक्षा) ममता गजभिये (नर्स इंचार्ज) सरोज गायकवाड (समाजसेवक ) प्रमुखाने उपस्थीत होते. या कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता प्रतिभा महेंद्र जिभकटे, शितल जुनघरे, आयुष जुनघरे, कांता कनोजिया, शिवानी जांगळे, आदींनी सहकार्य केले.