नागपूर :- महिला व बाल विकास मंत्री अदिती सुनील तटकरे ह्यांच्या वाढदिवसानिमित्त शाळेच्या अनाथ गरजू मुलांना फळ वाटप करून साजरा करण्यात आला.
अदिती तटकरे ह्यांनी अगदी कमी वयात मोठया जबाबदारीने महिला व बाल कल्याण खाते सांभाळल ह्याचा उल्लेख महाराष्ट्र राष्ट्रभाषाचे अध्यक्ष अजय पाटील ह्यांनी आपल्या भाषणात केला. गरीब गरजू महिलांना न्याय तसेच रोजगार देण्यासाठी त्या नेहेमीच प्रयत्नशील असतात.
राष्ट्रवादी काँग्रेस ( अजितदादा गटाचे ) नागपूर शहर महासचिव हरविंदर ( बंटी ) मुल्ला ह्यांनी सुद्धा अदिती तटकरे ह्यांना शुभेछया दिल्या.प्रामुख्याने अंगद सिंग , अम्रित सिंग, शुभंकर पाटील, सौरभ मगरे, डॉ समृद्धी तायडे व शाळेच्या सर्व शिक्षिका फळ वितरण करतांना उपस्थित होत्या.