प्रभाग क्र 3 च्या अतिवृष्टीग्रस्तांना आर्थिक मदत वितरण

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :-मागील वर्षी जुलै 2022 मध्ये झालेंल्या अतिवृष्टी वादळी पावसामुळे कामठी शहरातील विविध भागांतील नागरिकांच्या घराची पडझड होत मोठे आर्थिक नुकसान झाले असून प्रभाग क्र 3 मध्ये सुदधा मोठ्या प्रमाणात नागरिकांच्या घराची पडझड होत मोठे आर्थिक नुकसान झाले होते तर नैसर्गिक आपत्तीचा फटका बसलेल्या या अतिवृष्टीग्रस्त नागरिकांना नैसर्गिक आपत्ती नुकसानग्रस्त निधीचा लाभ मिळवून देण्यासाठी माजी नगरसेवक रघुवीर मेश्राम व माजी नगरसेविका प्रतिभा रघुवीर मेश्राम यांनी मदतीची धाव घेत लोकप्रतिनिधीची खरी भूमिका साकारत लोकसेवकांची कर्तव्यदक्ष भूमिकेतून प्रशासनाच्या मदतीतुन प्रभाग क्र 3 च्या जे पी नगर, कादर झेंडा,जुनी खलाशी लाईन च्या 208 च्या वरील अतिवृष्टीग्रस्त नागरिकांना नैसर्गिक आपत्तीचा नुकसानग्रस्त निधी मिळवुन देण्यात यश गाठले असून नुकतेच या नुकसानग्रस्त नागरिकांना प्रति लाभार्थी 10 हजार रुपये प्रमाणे नैसर्गिक आपत्ती नुकसानग्रस्त निधी चे वितरण करण्यात आले.तसेच नऊ नुकसानग्रस्त नागरिकांना प्रति लाभार्थीला 95 हजार रुपयेचे अनुदान देण्यात आले.

मागील वर्षी झालेल्या अतिवृष्टी ग्रस्तांना नैसर्गिक आपत्ती नुकसानग्रस्त निधीचा लाभ मिळवून देण्यासाठी नगर परिषद प्रशासन तसेच तहसील प्रशासनाच्या संयुक्त कारवाहिने केलेल्या नुकसानग्रस्त पंचनाम्यानुसार 13 फेब्रुवारी 2023 ला 24 लक्ष रुपयांचा निधी तहसील प्रशासनाला प्राप्त झाला त्यानुसार प्रभाग क्र 3 च्या 208 अतिवृष्टीग्रस्त नागरिकांना प्रति लाभार्थी 10 हजार रुपये प्रमाणे नुकसांनग्रस्त निधी देण्यात आला तसेच नऊ नुकसांनग्रस्तना प्रति लाभार्थीला 95 हजार रुपयेचे अनुदान देण्यात आले. प्रभाग क्र 3 च्या नैसर्गिक आपत्तीचा फटका बसलेल्या नुकसांनग्रस्त नागरिकांना आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी तहसीलदार अक्षय पोयाम, मुख्याधिकारी संदीप बोरकर, माजी नगरसेवक रघुवीर मेश्राम, माजी नगरसेविका प्रतिभा मेश्राम यासह नगर परिषद व तहसील प्रशासनाने मोलाची कर्तव्यदक्ष भूमिका साकारली.तर प्रभाग क्र 3 च्या नुकसानग्रस्त लाभार्थ्यांना आर्थिक अनुदान मिळा ल्याबद्दल समस्त लाभार्थ्यांनी माजी नगरसेवक रघुवीर मेश्राम, माजी नगरसेविका प्रतिभा मेश्राम सह तहसील व नगर परिषद प्रशासनाचे आभार मानले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

वार्षिक उद्योग पाहणी अहवालासाठी उद्योगांनी सहकार्य करावे - विजय आहेर

Wed Apr 26 , 2023
नागपूर :- वार्षिक उद्योग पाहणी अहवालाची माहिती देण्यासाठी सर्व उद्योगांनी सहकार्य करावे. कामाचे योग्य नियोजन करून शासनासाठी व उद्योग क्षेत्रासाठी महत्वाची असलेली माहिती या पाहणीच्या माध्यमातून वेळेत व अचूक उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने सहकार्य करण्याचे आवाहन अर्थ व सांख्यिकी संचालनालयाचे संचालक विजय आहेर यांनी केले. सन 2021-22 या वर्षासाठी संचालनालयाकडून नागपूर येथे नुकतेच तीन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com