संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- सध्याच्या धकाधकीच्या जीवनात अतिशय कठीण परिस्थिती निर्माण झाली आहे.विद्यार्थ्यांसह पालकासमोरही मोठे आव्हान निर्माण झाले आहे त्यामुळे पालकानी आपल्या मुला मुलीकडे लक्ष देण्याची गरज आहे असे मौलिक प्रतिपादन जुनी कामठी पोलीस स्टेशन चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रशांत जुमडे यांनी काल 15 ऑगस्ट ला दुर्गा चौक येथे स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून आशिष बुक डेपो व मित्र परिवार च्या वतीने आयोजित शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणीक साहित्याचे वितरण कार्यक्रमा प्रसंगी व्यक्त केले.याप्रसंगी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शालेय विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वितरण करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ऍड डी सी चहांदे,तर मुख्य पाहुणे म्हणून पोलीस निरीक्षक प्रशांत जुमडे, ऍड प्रवीण गजवे, माजी नगरसेवक प्रशांत नगरकर,डॉ अंकिता गेडाम,विरसेन गेडाम प्रामुख्याने उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक ऍड प्रवीण गजवे,संचालन प्रशांत नगरकर तर आभार प्रमोद बेलेकर यांनी मानले.या कार्यक्रमात विद्यार्थी,पालक व नागरिकगण मोठ्या संख्येत उपस्थित होते.