सीएसआर जर्नल एक्सलन्स अवॉर्डचे लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या हस्ते वितरण

मुंबई :- केंद्र व राज्य शासन हे समाजातील वंचित, गरीब घटकांसाठी अनेक योजना राबवित असते. शासनाबरोबरच अनेक उद्योग, संस्था व कंपन्या या सामाजिक उत्तरदायित्व निधीच्या माध्यमातून समाजातील विविध घटकांच्या उन्नतीसाठी काम करते. वंचित घटकांसाठीची ही सेवा निरंतर सुरू रहावी, असे प्रतिपादन लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी केले.

मुंबईतील जिओ सेंटर येथे आयोजित सीएसआर जर्नल एक्सलन्स अवॉर्ड कार्यक्रमात लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या हस्ते विविध पुरस्कारांचे वितरण झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार, महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे, खासदार सुनील तटकरे, आयओसीच्या अध्यक्ष पीटी उषा, सीएसआर जर्नल मुख्य संपादक अमित उपाध्याय, माजी खासदार गोपाळ शेट्टी, राहुल शेवाळे आदी उपस्थित होते.

समाजातील वंचित, घटकांच्या उन्नतीसाठी काम करणाऱ्यांना या पुरस्काराच्या निमित्ताने एकत्र आणण्याचे काम कौतुकास्पद असल्याचे सांगून बिर्ला म्हणाले की, समाजाप्रती उत्तरदायित्व निभावत गरिबांसाठी काम करणे ही भारताची संस्कृती, सामर्थ्य आहे. कोविड काळात आपली सामूहिक मदत करण्याची संस्कृती जगासमोर आली. अशाच प्रकारे पुढील काळातही सर्वांनी मिळून समाजातील वंचितांना आधार देऊया.

सीएसआरच्या माध्यमातून समाजातील गरीब घटकापर्यंत विकास पोचविण्याचे काम अनेक उद्योग, कंपन्या करत आहेत. याद्वारे समाजाला दिशा देण्याचे काम होत आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते विविध पुरस्कारार्थीचा गौरव करण्यात आला.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून अभिनेता गोविंदाच्या प्रकृतीबाबत विचारपूस

Tue Oct 1 , 2024
मुंबई :- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अभिनेता गोविंदा यांच्याशी संपर्क साधून त्यांच्यासोबत झालेल्या अपघातातबाबत विचारपूस केली. राज्य शासन व जनतेच्यावतीने लवकर बरे होण्यासाठी त्यांनी सदिच्छा व्यक्त केल्या आहेत. गोविंदा आणि त्यांच्या कुटुंबियांना या कठीण काळात सर्व आवश्यक मदत मिळेल याची खात्री मुख्यमंत्री यांनी दिली. तसेच आमच्या सदिच्छा आणि प्रार्थना त्यांच्यासोबत आणि त्यांच्या कुटुंबासोबत असल्याचेही त्यांनी सांगितले. गोविंदा हे भारतीय चित्रपटसृष्टीतील […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com