कुष्ठरोगावरील दिनदर्शिकेचे वाटप

– रोगाविषयी घ्यावयाची काळजी व माहिती मिळणार

चंद्रपूर :- चंद्रपुर महानगरपालिका,सहाय्यक संचालक (कुष्ठरोग), लेप्रा सोसायटी तेलंगना यांच्या वतीने कुष्ठरोगाची मुलभुत शास्त्रीय माहिती व कुष्ठरुग्णाने घ्यावयाची हातापायाची काळजी या बाबतची दिनदर्शिका तयार करण्यात आली असुन महानगरपालिका क्षेत्रातील कुष्ठरुग्णांना तसेच इतर नागरिकांना या दिनदर्शिकेचे वाटप 16 जानेवारी रोजी झालेल्या कार्यक्रमात करण्यात आले.

सन 2027 पर्यंत शून्य कुष्ठरोग प्रसारचे ध्येय साध्य करणे हे राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मुलन कार्यक्रमाचे उद्देश आहे. त्यादृष्टीने आरोग्य यंत्रणेमार्फत कुष्ठरोग निर्मूलनासाठी येत्या 30 जानेवारी ते 13 फेब्रुवारी या कालावधीत ‘स्पर्श’ कुष्ठरोग जनजागृती अभियान राबविण्यात येणार असून ‘कलंक कुष्ठरोगाचा मिटवू या, सन्मानाने स्वीकार करू या’ असे या वर्षी राबविण्यात येणाऱ्या ‘स्पर्श’ कुष्ठरोग जनजागृती अभियानाचे घोषवाक्य आहे.राज्यातील ग्रामीण व दुर्गम भागात तसेच ज्या जिल्ह्यात कुष्ठरोग झालेल्या रुग्णांचे प्रमाण जास्त आहे त्या जिल्ह्यांवर या अभियानात अधिक लक्ष देण्यात येणार आहे. शालेय विद्यार्थ्यांची तपासणी करून त्यांचा या अभियानात अधिकाधिक सहभाग वाढवून प्रोत्साहन देण्यात येणार आहे.

त्याचप्रमाणे कुष्ठरोग शोध अभियानाच्या माध्यमातुन समाजातील लोकांमध्ये कुष्ठरोगाबाबतचे गैरसमज, अंधश्रध्दा, भिती आहे ती दुर करुन हा आजार इतर आजारासारखाच सामान्य आजार आहे, ही भावना त्यांच्या मनात रुजविण्यासाठी दिनदर्शिका तयार करण्यात आली आहे. 16 जानेवारी रोजी महानगरपालिका क्षेत्रातील कुष्ठरुग्णांना तसेच सामान्य नागरिकांना या दिनदर्शिकेचे वाटप करण्यात आले. सदर कार्यक्रमात रुग्णांच्या आवश्यकतेनुसार अल्सरकिट व एम.सी. आर चप्पल यांचे वितरण आयुक्त विपीन पालीवाल यांच्या हस्ते करण्यात आले.

याप्रसंगी वैद्यकिय आरोग्य अधिकारी डॉ. नयना उत्तरवार व डॉ. संदिप गेडाम, सहाय्यक संचालक, आरोग्य सेवा, कुष्ठरोग,शहरी आरोग्य केंद्राचे वैद्यकिय अधिकारी व कुष्ठरोग कार्यालयातील कर्मचारी वृंद उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचलन श्री. पी. के. मेश्राम व आभार प्रदर्शन श्री. आर. एस त्रिपुरवार यांनी केले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

सेंट्रल इंडिया किडनी फाउंडेशनच्या वतीने मुलांसाठी चित्रकला आणि निबंध स्पर्धेचे आयोजन रविवारी

Sat Jan 25 , 2025
नागपूर :- सेंट्रल इंडिया किडनी फाउंडेशन नागपूरच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त 26 जानेवारी रोजी सेंट्रल इंडिया किडनी फाउंडेशन (CIKF) आपले २५ वे वर्ष साजरे करित आहे. या निमित्ताने सेंट्रल इंडिया किडनी फाउंडेशन मुलांसाठी चित्रकला आणि निबंध स्पर्धा दुपारी 3 ते 5 दरम्यान धंतोली गार्डन, अभ्यंकर मार्ग धंतोली नागपूर, येथे आयोजित करण्यात आले आहे. उपक्रमाला प्रवेश आणि नोंदणी शुल्क नाही. कार्यक्रमाचा तपशीलः गट […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!