दक्षिण-पश्चिम आणि पश्चिम नागपुरातील दिव्यांग व ज्येष्ठांना सहाय्यक साधने वितरण २४ सप्टेंबर रोजी

नितीन गडकरी व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रमुख उपस्थिती

नागपूर :-  भारत सरकारच्या सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालयद्वारे ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांच्या सशक्तीकरणासाठी केंद्र सरकारच्या दिव्यांग सहायता योजना (अडीप – असिस्टंट टू डिसेबल पर्सन) आणि राष्ट्रीय वयोश्री योजना अंतर्गत दिव्यांग आणि ज्येष्ठांना सहाय्यक साधने वितरण करण्यात येत आहेत.नागपूर महानगरपालिकेच्या माध्यमातून नागपूर शहरातील विधानसभा क्षेत्रनिहाय साहित्य वितरणाचे शिबिर घेण्यात येत असून, या अंतर्गत शनिवारी २४ सप्टेंबर २०२२ रोजी काछीपूरा चौक, पी. के. व्ही. मैदान दीक्षाभूमी येथे दक्षिण-पश्चिम आणि पश्चिम नागपूरमधील लाभार्थ्यांकरिता शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी १०.३० वाजता केंद्रीय मंत्री, सडक परिवहन व राजमार्ग मंत्रालय मा.नितीन गडकरी यांच्या हस्ते सहाय्यक साधने वितरण कार्यक्रमाचे उद्घाटन होईल. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्री मा.डॉ. वीरेंद्र कुमार आणि महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा.  देवेंद्र फडणवीस उपस्थित राहतील.

नागपूर शहर व जिल्हातील जेष्ठ नागरिक व दिव्यांगाना अनुक्रमे केंद्र शासन पुरस्कृत राष्ट्रीय वयोश्री योजना- २०२१ आणि दिव्यांग सहायता योजना (अडीप – असिस्टंट टू डिसेबल पर्सन) या अंतर्गत भारतीय कृत्रिम अंगनिर्माण निगम ( ALIMCO- Artifical Limbs Manufacturing Corporation Of India), नागपूर महानगरपालिका आणि समेकित क्षेत्रीय कौशल्य विकास पुनर्वास एवं दिव्यांग जन सशक्तीकरण केंद्र (सी.आर.सी. नागपूर) च्या वतीने नागपूर शहरातील दिव्यांग आणि ६० वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत सहायक साधने वितरित करण्यात येणार आहेत. काही दिवसांपूर्वी मध्य नागपुरातील ३२२३ लाभार्थ्यांना साहित्य, उपकरणे वितरित करण्यात आले होते. शनिवारी २४ सप्टेंबर रोजी काछीपूरा चौक, पी. के. व्ही. मैदान दीक्षाभूमी येथे दक्षिण-पश्चिम आणि पश्चिम नागपुरातील ३९५० लाभार्थ्यांना रु 4 कोटीचे सहाय्यक उपकरणांचे वितरण करण्यात येणार आहे. यामध्ये अडीपचे 372 आणि वयोश्रीचे 3578 लाभार्थी आहे. त्यांना 30520 उपकरण नि:शुल्क दिली जातील.

केंद्र शासन पुरस्कृत राष्ट्रीय वयोश्री योजना- २०२१ आणि दिव्यांग सहायता योजना (अडीप असिस्टंट टू डिसेबल पर्सन) या अंतर्गत साहित्य वितरणासाठी नागपूर महानगरपालिकेतर्फे २७ फेब्रुवारी ते २० मार्च २०२२ या कालावधीत दहाही झोन अंतर्गत नोंदणी शिबिर घेण्यात आले होते. या शिबिरांच्या माध्यमातून नागपूर शहरातील २७,३५६ वरिष्ठ नागरिक वयोश्री योजनामध्ये तसेच ७७८० दिव्यांगजन एडिप योजनामध्ये नोंदणी करण्यात आली आहे. एकूण ३५१३६ लाभार्थ्यांना ३४.८३ कोटी रुपये किंमतीची उपकरणे वितरित केले जाणार आहेत.

काछीपूरा चौक, पी. के. व्ही. मैदान दीक्षाभूमी येथील दक्षिण-पश्चिम आणि पश्चिम नागपूरमधील लाभार्थ्यांना केल्या जाणाऱ्या साहित्य वितरण कार्यक्रमाला जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन भारतीय कृत्रिम अंग निर्माण निगम, (एलिम्को), नागपूर महानगरपालिका, नागपूर जिल्हा प्रशासन आणि सीआरसी नागपूर यांनी केले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

नेहरुनगर झोनच्या मालमत्ता कर विभागाचे पाच कर्मचारी निलंबित

Fri Sep 23 , 2022
मनपा आयुक्तांनी केली नेहरूनगर झोनमध्ये आकस्मिक पाहणी नागपूर :-  मालमत्ता कर संकलनात हलगर्जीपणा केल्याप्रकरणी मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांनी नेहरूनगर झोनच्या पाच कर्मचाऱ्यांना तत्काळ निलंबित केले. बुधवारी (ता.२१) मनपा आयुक्तांनी नेहरूनगर झोनला आकस्मिक भेट देऊन पाहणी केली. यावेळी उपायुक्त (महसूल) मिलिंद मेश्राम व सहायक आयुक्त अशोक पाटील उपस्थित होते. सेवा पंधरवडा अंतर्गत मालमत्ता कर विभागाच्या सेवा नागरिकांना वेळेवर […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com