मध्य नागपुरातील दिव्यांग व ज्येष्ठांना सहाय्यक साधने वितरण १७ सप्टेंबर रोजी

 नितीन गडकरी, डॉ. वीरेंद्र कुमार व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रमुख उपस्थिती

नागपूर :- भारत सरकारच्या सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालयद्वारे ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांच्या सशक्तीकरणासाठी केंद्र सरकारच्या दिव्यांग सहायता योजना (अडीप – असिस्टंट टू डिसेबल पर्सन) आणि राष्ट्रीय वयोश्री योजना अंतर्गत दिव्यांग आणि ज्येष्ठांना सहाय्यक साधने वितरण करण्यात येत आहेत. नागपूर महानगरपालिकेच्या माध्यमातून नागपूर शहरातील विधानसभा क्षेत्रनिहाय साहित्य वितरणाचे शिबिर घेण्यात येत असून या अंतर्गत शनिवारी १७ सप्टेंबर २०२२ रोजी रेशीमबाग येथील कविवर्य सुरेश भट सभागृहामध्ये मध्य नागपूरमधील लाभार्थ्यांकरिता शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी १०.३० वाजता केंद्रीय मंत्री, सडक परिवहन व राजमार्ग मंत्रालय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते सहाय्यक साधने वितरण कार्यक्रमाचे उद्घाटन होईल. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्री डॉ. वीरेंद्र कुमार आणि महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस उपस्थित राहतील. या कार्यक्रमाला आमदार  गो.गाणार, प्रवीण दटके, अभिजीत वंजारी, चंद्रशेखर बावनकुळे, डॉ. नितीन राऊत, कृष्णा खोपडे, विकास कुंभारे, मोहन मते, विकास ठाकरे उपस्थित राहतील.

नागपूर शहर व जिल्हातील जेष्ठ नागरिक व दिव्यांगाना अनुक्रमे केंद्र शासन पुरस्कृत राष्ट्रीय वयोश्री योजना- २०२१ आणि दिव्यांग सहायता योजना (अडीप – असिस्टंट टू डिसेबल पर्सन) या अंतर्गत भारतीय कृत्रिम अंगनिर्माण निगम ( ALIMCO- Artifical Limbs Manufacturing Corporation Of India), नागपूर महानगरपालिका आणि समेकित क्षेत्रीय कौशल्य विकास पुनर्वास एवं दिव्यांग जन सशक्तीकरण केंद्र (सी.आर.सी. नागपूर) च्या वतीने नागपूर शहरातील दिव्यांग आणि ६० वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत सहायक साधने वितरित करण्यात येणार आहेत. मध्य नागपूरातील 3223 लाभार्थ्यांना सहाय्यक उपकरणांचे वितरण करण्यात येणार असून यामध्ये एडिप योजनाचे 289 आणि वयोश्री योजनाचे 2934 नागरिकांचा समावेश आहे. यांना रु 3.36 कोटी चे 24751 उपकरण वितरित केले जातील.

शनिवारी १७ सप्टेंबर रोजी कविवर्य सुरेश भट सभागृहामध्ये फक्त मध्य नागपुरातील 3223 लाभार्थ्यांना सहाय्यक उपकरणांचे वितरण करण्यात येणार आहे. मध्य नागपूर व्यतिरिक्त इतर कोणत्याही विधानसभा क्षेत्रातील नागरिकांना वितरण केले जाणार नाही.

काही दिवसांपूर्वी दक्षिण नागपुरातील ९०१८ लाभार्थ्यांना ९.१९ कोटी रुपये किंमतीची (अडीप – ८५४, वयोश्री- ८१६४) एकूण ६८,६८३ साहित्य, उपकरणे (अडीप- १७३१, वयोश्री- ६६९५२) वितरित करण्यात आली. त्यांनी पूर्व नागपुरातील ४५४९ (अडीप – ५९०, वयोश्री- ३९५९) लाभार्थ्यांना ४.८२ कोटी रुपये किंमतीची एकूण ३४१३० (अडीप- १२०२, वयोश्री- ३२९२८) साहित्य, उपकरणे वितरित करण्यात आले.

केंद्र शासन पुरस्कृत राष्ट्रीय वयोश्री योजना- २०२१ आणि दिव्यांग सहायता योजना (अडीप असिस्टंट टू डिसेबल पर्सन) या अंतर्गत साहित्य वितरणासाठी नागपूर महानगरपालिकेतर्फे २७ फेब्रुवारी ते २० मार्च २०२२ या कालावधीत दहाही झोन अंतर्गत नोंदणी शिबिर घेण्यात आले होते. या शिबिरांच्या माध्यमातून नागपूर शहरातील २७,३५६ वरिष्ठ नागरिक वयोश्री योजनामध्ये तसेच ७७८० दिव्यांगजन एडिप योजनामध्ये नोंदणी करण्यात आली आहे. एकूण ३५१३६ लाभार्थ्यांना ३४.८३ कोटी रुपये किंमतीची उपकरणे वितरित केले जाणार आहेत.

मध्य नागपुरातील रेशीमबाग येथील कविवर्य सुरेश भट सभागृहामधील साहित्य वितरण कार्यक्रमाला जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन भारतीय कृत्रिम अंग निर्माण निगम, (एलिम्को), नागपूर महानगरपालिका, नागपूर जिल्हा प्रशासन आणि सीआरसी नागपूर यांनी केले आहे.

 

 

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

‘लम्पी’चा प्रादुर्भाव टाळण्यासाठी प्रभावी उपाययोजना करा  - डॉ. माधवी खोडे-चवरे

Sat Sep 17 , 2022
प्रत्येक जिल्ह्याला डिपीसीतून एक कोटी निधी  पशुधन पर्यवेक्षकांची 53 पदे भरणार नागपूर :-  पशुधनावरील ‘लम्पी’ चर्मरोगाचा प्रादुर्भाव नागपूर विभागात आढळून आला असून आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जनावरांचे लसीकरण करण्यात येत आहे. या आजाराचा फैलाव होऊ नये, यासाठी तत्काळ प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात. यासाठी जिल्ह्यांना जिल्हा नियोजन योजनेतून एक कोटी रुपयाचा निधी खर्च करण्याची परवानगी देण्यात आली आहे. बाह्यस्त्रोताव्दारे 53 पशुधन पर्यवेक्षकांची पदे […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!