कन्हान :- नगरपरिषद अंतर्गत प्रभाग क्र. १ च्या ज्वलंत समस्या विषयी नगरपरिषद मुख्याधिकारी घोडके यांचेशी शिष्टमंडळाने चर्चा करून प्रभागातील समस्या त्वरित सोडविण्याची मागणी केली.
शुक्रवार (दि.२८) फेब्रुवारी ला कन्हान-पिपरी नगरपरिषद येथे मुख्याधिकारी घोडके यांचेशी नगर परिषद उपाध्यक्ष योगेंद्र रंगारी व सामाजिक कार्यकर्ते शरद वाटकर हयाच्या नेतुवात शिष्टमंडळाने नगरपरिषद अंतर्गत संपुर्ण प्रभाग क्र. १ मध्ये असलेल्या पाण्या च्या समस्या, नालीची समस्या, स्वच्छता तसेच शिव नगर येथिल कोचे किराणा दुकान मागच्या बाजुची नाली सह इतर संपुर्ण ज्वलंत समस्या सोडवि बाबत चर्चा करून उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली.
नागपरिषद कन्हान-पिपरी चे मुख्याधिकारी घोडके यांनी समाधानकारक चर्चा करून या समस्या तात्काळ मार्गी लावण्या विषयी शिष्टमंडळास आश्वस्त केले. याप्रसंगी शिष्टमंडळात नगरपरिषद उपाध्यक्ष योगेंद्र रंगारी व सामाजिक कार्यकर्ते शरद वाटकर हयाच्या नेतुवात लांजेवार काकाजी, मालाधरे, मेश्राम, प्रशांत मसार, नितीन गजभिये, मेश्राम आदी सह नागरिक प्रामुख्याने उपस्थित होते.