नागपूर :- नागपूर स्मार्ट अँड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड (NSSCDCL), नागपूर महानगरपालिका, जागतिक संसाधन संस्था (WRI) आणि ICLEI- दक्षिण आशिया यांच्या संयुक्त विद्यमाने “झिरो कार्बन बिल्डिंग एक्सलेटर (ZCBA)” प्रकल्पावर चर्चा करण्यासाठी नागपूर स्मार्ट सिटी कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत मनपा आयुक्त आणि प्रशासक राधाकृष्णन बी., स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी चिन्मय गोतमारे प्रामुख्याने उपस्थित होते.
झिरो कार्बन बिल्डिंग एक्सलेटर (ZCBA)” प्रकल्प 2018 ते 2020 या कालावधीत नागपुरात राबविण्यात आले होते. यासाठी नागपूर स्मार्ट सिटी तर्फे शहरासाठी विशिष्ट मार्गदर्शक तत्त्वे प्रकाशित करण्यात आले होते. या मार्गदर्शक तत्वामुळे, शहरातील नागरिकांना उत्तम हवामान आणि ऊर्जा कार्यक्षम घरे मिळण्यात मदत होईल. यासाठी एक रोडमॅप सुद्धा तयार केला जात आहे. यामागचा उद्देश आहे की, वर्ष २०५० पर्यंत शहरातील इमारती नेट झिरो बिल्डिंग बनतील.
झिरो कार्बन बिल्डिंग एक्सलेटर कार्यक्रम वर्ल्ड रिसोर्सेस इन्स्टिट्यूट (WRI) द्वारे लाँच करण्यात आला असून याला ग्लोबल एंवीरोन्मेन्ट फॅसिलिटी द्वारे सहकार्य प्राप्त झाले आहे. ICLEI दक्षिण आशिया हा ZCBA चा प्रादेशिक भागीदार आहे आणि नागपूर स्मार्ट सिटी तसेच मनपा सोबत काम करत आहे. नागपूरसाठी झिरो कार्बन बिल्डिंग कृती आराखडा विकसित करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत.
बैठकीत महापालिका आयुक्तांनी शून्य कार्बनच्या पायलट प्रोजेक्टवर भर दिला. त्यांनी सांगितले की, इमारती बांधकाम करतांना, पर्यावरणपूरक बांधकाम साहित्यावर भर देण्याची गरज आहे. यासाठी त्यांनी धोरणात्मक कृती करण्याची आणि त्या दिशेने आर्थिक पर्यायांचा शोध घेण्याची तयारी दर्शविली. यासाठी त्यांनी खासगी आणि शासकीय क्षेत्रांना सोबत मिळून काम करण्याचे आवाहन केले.
नागपूर स्मार्ट सिटी चे मुख्य कार्यकारी अधिकारी चिन्मय गोतमारे यांनी स्थानिक हवामान परिस्थिती आणि पारंपारिक पद्धती लक्षात घेऊन ZCB साठी मार्गदर्शक तत्व तयार करण्याचे निर्देश दिले. याप्रसंगी ICLEI दक्षिण आशिया, WRI, आणि इला ग्रीन बील्डींग अँन्ड ईन्फास्ट्क्चर कन्टसल्न्टंसीचे चे प्रतिनिधी यांनी ZCB रोडमॅपसाठी तयार केलेल्या माहितीचे सादरीकरण केले. यावेळी मनपा, नागपूर स्मार्ट सिटी आणि अन्य विभागाचे तज्ञ उपस्थित होते.