महसूल गुप्तचर संचालनालयाने मुंबई आणि नवी मुंबईतून 8.04 कोटी रुपये किंमतीच्या परदेशी नामचिन्हांकीत (ब्रँडेड) सिगारेट केल्या जप्त

मुंबई :- तस्करीच्या धंद्याविरुद्ध महत्त्वपूर्ण कारवाई करत, महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (DRI) मुंबई झोनल युनिट (MZU) या मुंबई विभागीय पथकाच्या अधिकाऱ्यांनी मुंबई आणि नवी मुंबईत अनेक ठिकाणी एकाच वेळी झडतीसत्रं राबवले. सिगारेट आणि इतर निषिद्ध वस्तूंच्या तस्करीत गुंतलेल्या जाळ्या (सिंडिकेट) द्वारे या परिसरात कारवाया सुरु होत्या.

गुप्तचरांकडून मिळालेल्या विशिष्ट माहितीच्या आधारावर, डीआरआयने समन्वयित कारवाई करत परदेशी नामचिन्हांकित (ब्रँडेड) सिगारेटच्या 53.64 लाख (53 लाख 64 हजार) कांड्या जप्त केल्या. या कांड्यांची एकूण किंमत 8.04 कोटी रुपये (8 कोटी 4 लाख रुपये) एवढी आहे. या कारवाईत या सिंडिकेटचा मुख्य सूत्रधार त्याच्या साथीदारासह पकडला गेला आहे. सीमाशुल्क कायदा, 1962 च्या तरतुदींनुसार त्यांना अटक झाली असून, सिगारेट तस्करीच्या व्यवहारातील आपला सहभाग, या दोघांनीही कबूल केला आहे.

डीआरआयने भारतातील तस्करीच्या अवैध धंद्यांना आळा घालण्यासाठी सातत्याने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. सिगरेट तस्करीचे हे जाळे उद्ध्वस्त करण्याची ही कारवाई म्हणजे, अशा बेकायदेशीर व्यापारात गुंतलेली जाळी नष्ट करण्यासाठी सुरू असलेल्या डीआरआयच्या प्रयत्नांचा एक भाग आहे.

@ फाईल फोटो

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे यांना सेवेत 30 जून 2024 पर्यंत एक महिन्याची मुदतवाढ केली मंजूर

Mon May 27 , 2024
नवी दिल्ली :- मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने 26 मे 2024 रोजी लष्करी नियम 1954 च्या नियम 16 अ (4) अंतर्गत लष्करप्रमुख (COAS)जनरल मनोज सी पांडे, पीव्हीएसएम, एव्हीएसएम, व्हीएसएम, एडीसी यांच्या सेवेत त्यांच्या सामान्य सेवानिवृत्ती वयापेक्षा (31 मे 2024) एक महिन्याच्या अधिक कालावधीसाठी म्हणजे 30 जून 2024 पर्यंत मुदतवाढ देण्यास मंजुरी दिली आहे. त्यांची 30 एप्रिल 2022 रोजी लष्करप्रमुख म्हणून नियुक्ती झाली […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com