दीनानाथ हायस्कुल संघ जिल्हा विजेतेपद पटकावित विभागीय स्पर्धेत प्रवेश

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

– कन्हान च्या विद्यार्थी खेडाळुंचे नागपुर महानगरात सुध्दा उत्कृष्ट खेळ

कन्हान :- दीनानाथ हायस्कुल नागपुर मुलांच्या संघा ने नागपुर महानगर जिल्हा टग ऑफ वॉर (रसी खेच) स्पर्धेत एकतर्फी विजेतेपद पटकावित चंद्रपूर येथे होणाऱ्या विभागीय स्पर्धेत आपल्या संघाचा प्रवेश निश्चित केला आहे. यात नऊ पैकी सात कन्हान च्या विद्यार्थी खेडाळुंचे नागपुर महानगरात सुध्दा उत्कृष्ट खेळले.

मंगळवार (दि.१६) ऑक्टोंबर ला मानकापुर क्रिडा संकुल नागपुर येथे नागपुर महानगर पालिका जिल्हा स्तरिय टग ऑफ वार (रसी खेच) स्पर्धेत दीना नाथ हायस्कुल नागपुर च्या १७ वर्ष वयोगटात मुलां च्या संघाने एकतर्फी झालेल्या लढतीत दीनानाथ संघाने सोमलवार हायस्कुल रामदास पेठ चा २ – ० असा धुव्वा उडवत विजेेतेपद पटकावित चंद्रपुर येथे होणा-या विभागिय स्पर्धेत आपल्या संघाचा प्रवेश निश्चित केला आहे. यात विजेत्या संघ खेडाळु विनित लुहोरे, आयुष दहिफळकर, उत्कर्ष रहाटे, यशश देशमुख, अथर्व चौकसे, अंश मोहने, तनिश मानकर, सोहम श्रीवास आणि रोमहर्ष महाजन आदींचा समावेश होता. यात नऊ पैकी सात विद्यार्थी खेडाळु हे कन्हान शहरातील आहे. डीएसओ टग ऑफ वॉर विजेतेपद पटकावल्यानंतर दीनानाथ हायस्कुलच्या मुलांचा संघाचे बंगाली एज्युकेशन सोसायटी व्यवस्थापनाचे सदस्य, प्रशासक तृप्ती घोष, मुख्याध्यापकआलोक कुमार सिन्हा, उपमुख्याध्यापक दिपंविता गांगुली, पर्यवेक्षक अंजू सेठ, सर्व शिक्षक, शिक्षिका व कर्मचारी वृंदानी शाळेच्या विजेता संघाचे आणि त्यांचे प्रशिक्षक रमेश मंडल सर यांचे अभिनंदन करून सर्व खेडाळुंना पुढील यशा करिता शुभेच्छा दिल्या आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

Annamrita to Provide Wheat Roti Monthly in School Nutrition Program

Fri Oct 18 , 2024
– Municipal Commissioner Dr. Abhijit Chaudhary inaugurated an automatic wheat roti-making machine NAGPUR :- Under the guidance of Srila Lokanath Swami Maharaj, a cherished disciple of Srila Prabhupada, the founder Acharya of the International Society for Krishna Consciousness (ISKCON), Municipal Commissioner Dr. Abhijit Chaudhary inaugurated an automatic wheat roti-making machine at Swarnlata and Govind Dasji Sarraf (Tumsarwale) centralized kitchen, located […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com