मराठी माणसाने राजधानी दिल्लीत प्रभावीपणे आपला ठसा उमटवावा परिसंवादात मान्यवरांचा सूर

नवी दिल्ली :- मराठी माणसाने राजधानी दिल्लीत भूतकाळात प्रभावीपणे आपला ठसा उमटवलेला आहे. आज तो अधिक प्रभावीपणे उमटविण्याची आज गरज आहे.

मराठी माणूस दिल्लीत टिकला पाहिजे, मराठी संस्कृती वाढीस लागली पाहिजे, अशी भावना आज ” मराठी भाषा, मराठी माणूस आणि दिल्ली ” या परिसंवादात मान्यवरांनी व्यक्त केली.

दिल्लीत होणार्‍या 98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने हा परिसंवाद महाराष्ट्र सदन येथे आयोजित करण्यात आला होता. सहरद या संस्थेने या परिसंवादाचे आयोजन केले.

सर्वश्री खासदार सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे, अरविंद सावंत, मेधा कुलकर्णी, वैभव डांगे, ज्येष्ठ पत्रकार सुनील चावके , तामिळनाडू कॅडरचे सध्या केंद्रीय शिक्षण खात्याचे सचिव आनंद पाटील, भारतीय डाक सेवेचे अधिकारी कौस्तुभ देशमुख या मान्यवरांनी या परिसंवादात भाग घेतला. पत्रकार प्रशांत वाघाये यांनी संवादक म्हणून भूमिका पार पाडली. या मान्यवरांना प्रश्नोत्तरे विचारून बोलते करण्यात आले.

आपल्या पुढच्या पिढीला मराठी भाषा पोहोचविण्यासाठी प्रत्येकाने आपल्या परीने प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या. होणारे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे दिल्लीत होणार असून उत्तर भारत आणि महाराष्ट्राचा धागा जोडणारे आहे.

संयुक्त महाराष्ट्र चळवळीनंतर महाराष्ट्राने प्रयत्नाने दिल्लीत आपले वेगळे हा निर्माण केले. मुंबई सारख्यां शहरात केंद्र शासनाच्या विविध आस्थापनेवर मराठी अधिकारी असावेत, अशी अपेक्षा श्री सावंत यांनी व्यक्त केली.

अर्थ संकल्प सादर होण्याआधी सर्व पक्षीय खासदाराची बैठक घेण्याची परंपरा होती. ती परंपरा पुन्हा सुरू व्हावी त्यामुळे राज्यातील आणि दिल्लीतील मराठी माणसांचे प्रश्न मांडणे सोयीचे होईल, असे कोल्हे यावेळी म्हणाले. तसेच महाराष्ट्राला महापुरुषांची मोठी परंपरा असून या महापुरुषांच्या इतिहास राष्ट्रीय स्तरावर वारंवार मांडता आला पाहिजे.

मराठी माणसाला दिल्लीत तो मराठी आहे म्हणून कोणी प्रतिष्ठा देणार नाही तर ती निर्माण करावी लागेल. इथला मराठी माणसाची सांस्कृतिक भूक भागविण्यासाठी प्रयत्न करावे लागतील, असे सांगून वैभव डांगे यांनी दिल्लीतील मराठी माणसाचा इतिहास विशद केला.

मराठी पत्रकार दिल्लीत येतात तेव्हा महाराष्ट्रातील दोर कापून टाकलेले असतात. मराठी पत्रकारांना भेडसावणाऱ्या समस्या सोडविण्यासाठी सहकार्य केले पाहिजे , अशी अपेक्षा ज्येष्ठ पत्रकार सुनील चावके यांनी व्यक्त केली.

केंद्र शासनाच्या विविध खात्यात अधिकाधिक मराठी तरुण वर्ग घ्यायला हवा त्यासाठी येथे असलेले वरिष्ठ मराठी अधिकारी त्यांना सर्वतोपरीने सहकार्य करण्यासाठी सदैव तयार आहेत, असे आनंद पाटील म्हणाले. पाटील हे तमिळनाडू कायदेशीर अधिकारी आहेत. सुरुवातीला भाषेच्या अडचणी कशा आल्या याबद्दल त्यांनी त्यांचा अनुभव सांगितला.

अतिशय दिमाखदारपणे हा परिसंवाद पार पडला. मोठ्या संख्येने लोक या परिसंवादासाठी उपस्थित होते. सर्व मतभेद विसरून राज्यकर्ते, अधिकारी यांनी मराठी भाषा आणि मराठी समाजासाठी एकत्र आले पाहिजे, असे आवाहन पाटील यांनी केले.

मराठी नाटके, सिनेमा, साहित्याला राजाश्रय मिळाला तरच मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला याला अर्थ येईल, असे आहे कोल्हे म्हणाले.

मेधा कुलकर्णी यांनी मराठी भाषेतील साहित्य हे व्याकरणाच्या दृष्टिकोनातून योग्य असायला हवे अशी अपेक्षा व्यक्त केली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक येथे 31 मार्च पर्यंत महाराष्ट्र इको ग्लॅम्पिंग महोत्सव - पर्यटन मंत्री शंभूराज देसाई

Fri Feb 7 , 2025
मुंबई :- पर्यटन विभागाकडून पहिल्यांदाच महाराष्ट्रात नाशिक जिल्ह्यातील गंगापूर येथे 31 मार्च 2025 पर्यंत महाराष्ट्र इको ग्लॅम्पिंग महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. सन 2027 मध्ये नाशिक शहर व त्र्यंबकेश्वर येथे सिंहस्थ कुंभमेळा होणार आहे. देशपातळीवरचा हा धार्मिक सोहळा असल्यामुळे मोठ्या संख्येने भाविक या ठिकाणी येणार आहेत. त्यामुळे सर्व यंत्रणाकडून सूक्ष्म नियोजन असणे गरजेचे आहे,या कुंभमेळ्याच्या आयोजनच्या पूर्वतयारीच्या दृष्टीने ग्लॅम्पिंग महोत्सव […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!