पत्रकारांच्या विविध मागण्यांसाठी व्हाईस ऑफ मीडियातर्फे ११ मे रोजी धरणे आंदोलन

नागपूर :- पत्रकारांशी संबंधित महत्त्वाच्या विषयांवर सरकारचे लक्ष वेधण्यासाठी व्हाईस ऑफ मीडियाच्या वतीने ११ मे रोजी राज्यभर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. याअंतर्गत नागपुरात ११ मे रोजी सकाळी ११ ते १ या वेळेत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येईल व मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सोपविण्यात येईल.

पत्रकारांसाठी स्वतंत्र कल्याणकारी महामंडळ स्थापन करुन त्याला भरीव निधी द्यावा, पत्रकारितेत ५ वर्ष पुर्ण केलेल्या पत्रकारांना सरसकट अधिस्वीकृती पत्रिका देण्यात यावी, वृत्तपत्रांना सध्या जाहिरातीवर लागु असलेला जीएसटी रद्द करावा, पत्रकारांच्या घरांसाठी म्हणून विशेष बाब म्हणून शासकीय भूखंड देण्याचा निर्णय घ्यावा., कोरोनात जीव गमावलेला पत्रकारांना फ्रंट लाईन वर्कर चा दर्जा देऊन त्यानुसार मयत पत्रकारांच्या कुटुंबांचे पुनर्वसन करावे, शासनाचे सध्याचे जाहिरात धोरण क वर्ग दैनिके (लघु दैनिक) यांना मारक आहे. लघु दैनिकांनाही मध्यम (ब वर्ग) दैनिकांइतक्याच जाहिराती देण्यात याव्यात. साप्ताहिकांनाही त्या प्रमाणात जाहिराती द्याव्यात अशा विविध मागण्यांकडे धरणे आंदोलनाच्या माध्यमातून लक्ष वेधण्यात येणार आहे. सदर धरणे आंदोलनात जिल्ह्यातील पत्रकारांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन व्हाईस ऑफ मीडियाच्या वतीने करण्यात आले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

39 दिव्यांग लाभार्थ्याना अपंग निधी अनुदान वितरण

Tue May 9 , 2023
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- आज मंगळवारला भिलगाव ग्रा प कार्यालयाच्या वतीने ग्राम पंचायत कार्यालय भिलगाव स्व निधी अंतर्गत 39 दिव्यांग लाभार्थ्यांना आर्थिक वर्षातील ५ टक्के अपंग निधी प्रत्येकी ११,००० अनुदान वितरण करण्यात आले. यावेळी भिलगाव ग्राम पंचायत सरपंच भावना चंद्रकांत फलके, उपसरपंच मनोज जिभकाटे, सदस्य शेखर वंजारी, सदस्या रेणुरानी सोनी, वृशाली सहारे, लतेश्वरी काळे, नैना देशभ्रतार, उषा उईके, […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com