अमरदिप बडगे,प्रतिनिधी
हजार रुपये भाव न मिळाल्यास गावो गावी आंदोलन करणार .
रात्री उशिरा पर्यंत आंदोलन सुरु असून पालक मंत्री यांना दिले निवेदन.
गोंदिया :- संपूर्ण विदर्भात धानाची शेती मोठ्या प्रमाणात होत असते त्या करिता धानाला एक हजार रुपये बोनस देण्यात यावा या मागनीला घेऊन राष्ट्रवादि काँग्रेस पार्टीचे गोंदिया जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरने आंदोलन करण्यात आले. यावेळी आमदार मनोहर चन्द्रिकापुरे व आमदार राजू कारमोरे या आंदोलनात उपस्थित होते. यावेळी धानाला एक हजार रुपये बोनस द्यावा, शेतकरी व शेतमजूर यांच्यावर आलेली बेरोजगारी दूर करावी, सामान्य लोकांना महागाई पड़त असलेली मार लक्षात घेता उचित उपाय योजना करावी.
तसेच शेतकऱ्या कडून आदि मागण्या करण्यात आल्या असुन गोंदियाचे पालक मंत्री सुधीर मुनगंटीवार गोंदिया दौऱ्यावर आले असुन जिल्हा अधिकारी येथे डीपीडीसी ची बैठक रात्री पर्यंत सुरु असली तरी या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस ने रात्री निवेदन देत धानाला एक हजार भाव देण्यात यावा याचे निवेदन पालक मंत्री यांना दिले व मागणी पूर्ण न झाल्यास गावो गावी तीव्र आंदोलन करण्याचा यावेळी इशारा ही देण्यात आला आहे.