– शिक्षणाधिकारी यांच्या हस्ते मुख्याध्यापक व शाळेचा गौरव.
कन्हान :- शालेय शिक्षण विभागाच्या वतीने पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी अपार आयडी लागु केली आहे. जिल्ह्य़ात याचे काम संथगतीने सुरू असताना धर्मराज प्राथमिक शाळा कांद्री-कन्हान ने मात्र मुदती च्या आत शतप्रतिशत टप्पा गाठुन सुखद धक्का दिला आहे.
शिक्षणाधिकारी कार्यालयात मंगळवार (दि. ३) डीसेंबर ला प्राथमिक शिक्षणाधिकारी सिद्धेश्वर काळुसे यांचे हस्ते पारशिवनी तालुक्यातील कांद्री-कन्हान येथील धर्मराज प्राथमिक शाळेला अपार अभिनंदन पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी शिक्षणाधिकारी काळुसे यांनी शाळाबाह्य विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासाचा तपशिल, गुणपत्रिका, विद्यार्थ्यांना शासनाकडुन मिळणाऱ्या सोयी-सुविधा, शाळाबाह्य विद्यार्थी व अर्ध्यातुन शाळा सोडलेल्या विद्यार्थ्यांचे प्रमाण कमी करून त्यांना पुन्हा शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आता APAAR ‘अपार’ (ॲटोमेटेड पर्मनंट ॲकेडमिक रेजिस्ट्री) आयडी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. ‘डिजीलॉक र’च्या मदतीने ‘अपार’मधुन सर्व शैक्षणिक वर्षातील विद्यार्थ्यांच्या नोंदी पाहता येतील असे सांगितले.
शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांचा ‘अपार आईडी चा आदेश काढला आणि इयत्ता १ ते १२ वी पर्यत चे सर्वच जिल्हा परिषद, खासगी अनुदानित शिक्षक विद्यार्थी यांच्या पालकांचे आधार कार्ड गोळा करत अपार आईडी च्या कामाला लावले आहे. मात्र शासकीय व निमशासकीय शाळांमध्ये युनिक आयडी ऑटोमेटेड परमनंट अँकॅंडमिक अकाउंट रजिस्ट्री (एपीएआर) तयार करण्याचा कामाला गती मिळत नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. याही परिस्थितीत ग्रामीण भागातील सर्वांत मोठी पटसंख्या असलेली पारशिवनी तालुक्यातील धर्मराज प्राथमिक शाळा, कांद्री-कन्हान येथील मुख्याध्यापक खिमेश बढिये यांच्या नेतृत्वात शिक्षकांनी नियोजनबद्ध काम करुन ३० नोव्हेंबर २०२४ या अंतिम दिवसाच्या अगो दरच १०० % काम करुन अपार आयडी तयार करुन आघाडी घेतली.
शिक्षणाधिकारी कार्यालयात निर्धारित वेळेत अपार आयडीचे काम पूर्ण केल्याबद्दल प्राथमिक शिक्षणाधिकारी सिद्धेश्वर काळुसे यांचे हस्ते धर्मराज प्राथमिक शाळा, कांद्री -कन्हानचा स्मृतीचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. हा पुरस्कार शाळेच्या वतीने मुख्याध्यापक खिमेश बढिये यांनी स्विकारला. यावेळी शाळेतील सहकारी शिक्षक भिमराव शिंदेमेश्राम, गणेश खोब्रागडे, जिल्हा डाटा एन्ट्री समन्वयक तेजराम येनसकर, मुख्य लिपीक योगेश राठोड यांच्यासह शिक्षण विभागातील अधिकारी बहु संख्येने उपस्थित होते.
धर्मराज प्राथमिक शाळेने अपार चा यशस्वी टप्पा गाठल्याबद्दल संस्थेचे संचालक खुशालराव पाहुणे, उपशिक्षणाधिकारी निखिल भुयार, पारशिवनी खंडविकास अधिकारी जाधव, पारशिवनी गटशिक्षणाधिकारी कैलास लोखंडे , शिक्षण विस्तार अधिकारी सुनील कोडापे, प्रभारी शिक्षण विस्तार अधिकारी व केंद्र प्रमुख लता माळोदे यांनी अभिनंदन केले आहे.