धरमपेठ झोन: आईबीएम मुख्य जलवाहिनीवर १२ तासांचे शटडाऊन मार्च १७ ला

नागपूर :- नागपूर महानगर पालिका येत्या १७ मार्च (शुक्रवार) रोजी , धरमपेठ झोन अंतर्गत येणाऱ्या सीपी क्लब -रवी नगर टी पॉईंट जवळ असलेल्या २०० मी मी व्यासाच्या -आईबीएम मुख्य जलवाहिनीवर १२ तासांचे शटडाऊन सकाळी ९ते रात्री ९ दरम्यान घेणार आहेत. ह्या शटडाऊन अंतर्गत २०० मी मी व्यासाची हि मुख्य जलवाहिनीवर टाकलेल्या १००० मी मी व्यासाच्या जलवाहिनी च्या अलाइनमेंट मध्ये येत आहे. १००० मी मी व्यासाची जलवाहिनी टाकल्यानंतर हि २०० मी मी व्यासाची जलवाहिनी पूर्ववत करण्यात येईल.

ह्या शट डाऊन १७ मार्च (शुक्रवारी) पाणीपुरवठा बाधित राहणारे भाग: रवि नगर, पीडब्लूडी क्वार्टर्स , हाय कोर्ट न्यायाधीश बंगलो , सी पी क्लब , विभागीय आयुक्त निवास, रेल्वे enclave , सिबीआय कार्यालय , केम्ब्रिज रोड, गॅझेटेड ऑफिसर कॉलोनी, रामगिरी स्लम आणि इतर परिसर .

ह्या  शटडाऊन दरम्यान टँकर्सद्वारेही पाणीपुरवठा होणार नसल्याने, मनपा-OCWने नागरिकांना पुरेसा पाणीसाठा करून सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

कुठंल्याही प्रकारच्या अधिक माहितीकरिता नागरिक नागपूर महानगरपलिका व ऑरेंज सिटी वॉटर च्या नि:शुल्क मदत क्रमांक १८००- २६६-९८९९ वर संपर्क करू शकतात

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

जी-20 परिषद ; उज्ज्वलनगर मेट्रो स्टेशनखाली अवतरली आदिवासींची गौरवशाली परंपरा

Thu Mar 16 , 2023
नागपूर :- वर्धा रोडवरील उज्ज्वलनगर मेट्रो स्टेशनच्या पीलर दरम्यान विदर्भातील आदीवासी व त्यांची गौरवशाली परंपरा दर्शविणारे देखावे आज लावण्यात आले आहेत. यामुळे या परिसरास देखणे स्वरुप प्राप्त झाले आहे.  सी-20 परिषदेसाठी नागपूर शहरात येणाऱ्या देश-विदेशातील पाहुण्यांना महाराष्ट्र व विदर्भाच्या समृद्ध वारश्याचे देखाव्यांच्या माध्यमातून दर्शन घडविण्यात येणार आहे. यासाठी विमानतळ ते छत्रपती चौकादरम्यानच्या तीन मेट्रोस्टेशन खाली ऐतिहासिक व सांस्कृतिक समृद्धता दर्शविणारे […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!