अमरदिप बडगे, प्रतिनिधी
भारतीय बौद्ध महासभा तिरोडा तालुका कार्यकारिणीची बैठक
गोंदिया : ‘वर्ल्ड फिलोशिप ऑफ बुद्धिस्ट्स’ या आंतरराष्ट्रीय बौद्ध संघटनेचे सदस्य असलेल्या भारतीय बौद्ध महासभेचे (द बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया) राष्ट्रीय अध्यक्ष राजरत्न आंबेडकर (डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे पणतू) यांचे 12 नोव्हेबर रोजी गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा येथे आगमन होत आहे. दुपारी 12 वाजता अटलबिहारी वाजपेयी सभागृह तिरोडा येथे त्यांच्या तालुकस्तरीय धम्मपरिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.
या धम्मपरिषदेचे मुख्य मार्गदर्शक राष्ट्रीय अध्यक्ष राजरत्न आंबेडकर यांच्यासोबत मार्गदर्शक म्हणून राष्ट्रीय कोषाध्यक्ष शशीकांत जाधव, नागपूरचे विभागीय अध्यक्ष विजय बंसोड, गोंदिया जिल्हा अध्यक्ष महेंद्र मेश्राम (कार्यक्रमाचे अध्यक्ष), तिरोडा तालुका अध्यक्ष देवानंद शहारे (कार्यक्रमाचे मुख्य संयोजक) व दोन भंते उपस्थित राहणार आहेत.
TBSI चे राष्ट्रीय अध्यक्ष राजरत्न आंबेडकर यांचे तिरोड्यात आगमन व धम्मपरिषदेचे नियोजन यानिमित्त तिरोडा तालुका कार्यकारिणीची बैठक तालुका अध्यक्ष देवानंद शहारे यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच पार पडली. 12 नोव्हेंबर रोजी होणार्या तालुकास्तरीय धम्मपरिषदेचे नियोजन व व्यवस्था सांभाळण्यासाठी पुरुषांच्या 3 व महिलांच्या 3 अश्या एकूण 6 धम्मपरिषद कमिटी गठित करण्यात आल्या आहेत. या सर्व कमिटीना विविध कामे सोपविण्यात येणार आहेत.
यात धम्मपरिषद पुरुष कमिटी-1 चे प्रमुख म्हणून मनोज वासनिक यांची निवड करण्यात आली. त्यांनी सुचविलेल्या त्यांच्या टीममध्ये पवन वासनिक, निशांत बंसोड, राहुल मेश्राम, राजेश वासनिक, संजय श्यामकुवर, अनुल गजभिये, गजभिये, सचिन वासनिक, शिव गेडाम, निशांत चौरे व राष्ट्रपाल गजभिये यांचा समावेश आहे.
धम्मपरिषद पुरुष कमिटी-2 चे प्रमुख म्हणून अॅड. दुर्वास रामटेके यांची निवड झाली. त्यांनी सुचविलेलेल्या त्यांच्या टीममध्ये अॅड.नरेश शेंडे, डॉ.आशीष बंसोड, राजविलास बोरकर, जितेंद्र चव्हाण, रवी राऊत, प्रा.लेखानंद राऊत, मनोज जांभूळकर (चिरेखनी), उमेश कोटांगले (परसवाडा), कृष्णा मेश्राम, शैलेन्द्र कोचे यांचा समावेश आहे.
धम्मपरिषद पुरुष कमिटी-3 चे प्रमुख म्हणून यांची अमरदीप बडगे यांची निवड झाली. त्यांनी सुचविलेल्या त्यांच्या टीममध्ये राजविलास बोरकर (मनोरा), आशीष दुपारे, डेनीकुमार बंसोड, सागर चव्हाण, अजय नंदागवळी, अतित डोंगरे, गौतम शेंडे, रंजीत वासनिक, संघपाल रोडगे, गौतम नारनवरे यांचा समावेश आहे.
धम्मपरिषद महिला कमिटी-1 च्या प्रमुख म्हणून प्रीती अनिल रामटेके यांची निवड झाली. त्यांनी सुचविलेल्या त्यांच्या टीममध्ये सरिता तेजसिंग चव्हाण, अंजली विनोद चव्हाण, पौर्णिमा संदीप नंदागवळी, ज्योती जितेंद्र बंसोड, सपना देवेंद्र रामटेके, स्वाती सुशील रामटेके, सुचिता लारेन्द्र गेडाम, ज्योत्स्ना चित्तरंजन मेश्राम, डार्विन संजय मेश्राम यांचा समावेश आहे.
धम्मपरिषद महिला कमिटी-2 च्या प्रमुख म्हणून ज्योती अजय सावनकर यांची निवड झाली. त्यांनी सुचविलेल्या त्यांच्या टीममध्ये प्रीती शरद शेंडे, अल्का सुबोध कोटांगले, अर्चना चिंचखेडे, अॅड.सुप्रिया वासनिक, माधुरी चंद्रिकापुरे, चित्रशीला मेश्राम, अर्चना कोटांगले, घनिशा जनबंधू, शीतल रवी राऊत यांचा समावेश आहे.
धम्मपरिषद महिला कमिटी-3 च्या प्रमुख म्हणून प्रीती अनमोल चव्हाण यांची निवड झाली. त्यांनी सुचविलेल्या त्यांच्या टीममध्ये विद्या कोटांगले, रूपाली चव्हाण, रचना विमनकर, यशोदा नारनवरे, पविता कोटांगले, ज्योती बंसोड, प्रमिला कोटांगले, ममता जनबंधू, पूनम कोटांगले व प्रतिमा कोटांगले यांचा समावेश आहे.
संपूर्ण कार्यक्रमाची रूपरेखा लवकरच कळविण्यात येईल. सदर तालुकास्तरीय धम्मपरिषद यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी तिरोडा शहर व तिरोडा ग्रामीण (सर्व गावे) येथील सर्व बुद्ध विहार कमिट्यांच्या अध्यक्षांनी सहकार्य करावे तथा आपापल्या भागातील व गावातील सर्व उपासक व उपासिका यांना 12 नोव्हेंबर रोजी पांढरे कपडे परिधान करून धम्मपरिषदेला उपस्थित राहण्याबाबत कळवावे, असे आवाहन यावेळी द बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे तिरोडा तालुका अध्यक्ष देवानंद शहारे यांनी केले आहे.