संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
– कामठी तालुक्यात गणेशोत्सवाची धूम
कामठी :- उद्या 19 सप्टेंबर पासून गणेशोत्सवाला सुरुवात होत आहे त्यामुळे कुटुंबियांसह गणेशोत्सव साजरा करण्याचे नियोजित करण्यात आले आहे यासाठी आवडती गणेशमूर्ती खरेदी करण्यासाठी अनेकांनी बाजारात गर्दी केल्याचे पाहायला मिळत आहे.
उद्या 19 सप्टेंबर पासून साजरा होणाऱ्या गणेशोत्सवाची कामठी तालुक्यात जोरदार तयारी केल्या जात असताना गणेशोत्सवासाठी सार्वजनिक गणेश मंडळातर्फे भव्य मंडपाची उभारणी केल्या जात आहे .यावर्षी गणेशोत्सवासाठी सर्वत्र उत्साहाचे वातावरण दिसत असताना हा उत्सव मोठ्या उत्साहात व विविध कार्यक्रमा द्वारे साजरा केला जाणार आहे.
विघ्नहर्ता श्री गणपती बाप्पा चे आगमन 19 सप्टेंबर 2023 ला होत आहे.सतत दहा दिवस मुक्कामी असणाऱ्या मांगल्याचे प्रतीक गणपती बाप्पा यांच्या गणेशोत्सवासाठी यावर्षी कामठी तालुक्यातील शहर तसेच ग्रामीण भागात मोठ्या उत्साहाचे वातावरण पहावयास मिळत आहे.गणेशोत्सवासाठी यावर्षी मुर्ती स्थापणेसाठी मोठ्या मूर्तींना प्राधान्य दिले जात असून मोठ्या मूर्तीची मागणी वाढली आहे.तर हा उत्सव घराघरात साजरा केल्या जाणार आहे.
..मांगल्याचे प्रतीक असलेले गणपती बाप्पा यांच्या आगमनानिमित्त घराघरात भक्तीपूर्ण वातावरनात व श्रद्धेतून गणेशोत्सव साजरा केला जात असताना गणेश मूर्ती स्थापणेची प्रत्येकाना उत्सुकता लागली आहे.गणेश मूर्ती स्थापणेची तयारी ही घराघरात केल्या जात असून ही गणेश मूर्ती स्थापनेसाठी आकर्षक सजावट केल्या जात आहे तसेच या उत्सवासाठी लहान बालक व युवकही पुढे सरसावले असून यावेळी हा गणेशोत्सव सार्वजनिक गणेश मंडळ बरोबरच गणेश भक्तातर्फे प्रसादाचे वाटप,सजावट, विविध स्पर्धा, खेळ, रक्तदान शिबिरब,धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाद्वारे हा सण उत्साहात साजरा करण्यासाठी सर्वत्र जोरदार तयारी केल्या जात असल्याचे चित्र तालुक्यात दिसत आहे.