राज्यातील लोकसभेच्या सर्व जागा जिंकण्याचा निर्धार करा – अकोला येथील बैठकीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा पदाधिकाऱ्यांना आदेश

अकोला :- राज्यातील सर्व 48 लोकसभेच्या जागांवर महायुतीचे उमेदवार जिंकण्यासाठी निर्धार करा, असा आदेश केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मंगळवारी दिला. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विदर्भातील 6 मतदारसंघांचा आढावा घेण्यासाठी अकोला येथे झालेल्या पक्षाच्या लोकसभा निवडणूक व्यवस्थापन समितीच्या व लोकसभा कोअर कमिटीच्या बैठकीत शाह बोलत होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि निवडणूक व्यवस्थापन समिती, लोकसभा कोअर कमिटीचे पदाधिकारी या बैठकीला उपस्थित होते. या बैठकीत शाह यांनी अकोला, अमरावती, बुलढाणा, यवतमाळ-वाशीम, वर्धा व चंद्रपूर या मतदारसंघांतील पक्षाच्या संघटनात्मक तयारीचा आढावा घेतला.

यावेळी शाह म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आगामी लोकसभा निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीला 400 पेक्षा अधिक जागांवर विजय मिळेल असा विश्वास व्यक्त केला आहे. पंतप्रधान मोदी यांचा हा संकल्प प्रत्यक्षात उतरवायचा असेल तर महाराष्ट्रातील सर्व जागांवर महायुतीच्या उमेदवारांना विजयी करण्यासाठी प्रत्येकाने झटून कामाला लागावे लागेल. कार्यकर्त्यांनी मोदी सरकारच्या कल्याणकारी योजनांच्या आणि विकासकामांच्या आधारावर मते मागायची आहेत. मोदी सरकारच्या कल्याणकारी योजना तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी घरोघरी जाऊन जनतेशी संपर्क प्रस्थापित करावा.

आपला उमेदवार विजयी होण्यासाठी प्रत्येक बूथ सशक्त करण्यासाठी आपणा सर्वांना लक्ष द्यावे लागणार आहे, असा कानमंत्रही त्यांनी उपस्थित पदाधिकारी, कार्यकर्त्यांना दिला. महायुतीचा उमेदवार हा भाजपाचाच उमेदवार आहे असे समजून एकदिलाने महायुतीच्या उमेदवाराच्या विजयासाठी अहोरात्र काम करा असेही ते म्हणाले.

मोदीच्या नेतृत्वाखाली देशाने आर्थिक विकासाचे नवनवे विक्रम प्रस्थापित केले आहेत. देशाच्या विकासाची गती कायम राखण्यासाठी लोकसभा निवडणुकीत एनडीए विजयी होणे आवश्यक असल्याचे मतदारांना पटवून दिले पाहिजे, असेही शाह यांनी नमूद केले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

टेकड़ी रोड हनुमान मंदिर से निकलेगी बाबा महाकाल की शाही बारात

Tue Mar 5 , 2024
नागपुर :- महाशिवरात्रि के अवसर पर श्री टेकड़ी रोड हनुमान मंदिर समिति, गवलीपुर, सीताबर्डी की ओर से 8 मार्च को बाबा महाकाल की शाही बारात शाम 4 बजे हनुमान मंदिर से निकाली जाएगी। शिव जी की बारात मुंडा देवल से वैरायटी चौक, लोहापुल माता मंदिर से होते हुए वापस टेकड़ी रोड हनुमान मंदिर पहुँचेगी। बारात में शिव पार्वती की सजीव झांकी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!