कोदामेंढीत 51 संख्या जास्त असूनही मतदानात लाडक्या बहिणी 21 मतांनी राहिल्या मागे

– नाव सांगण्यास टाळाटाळ करणाऱ्या मतदार अधिकारी व पोलीस शिपाई यांच्या बुथ क्रमांक 161 मध्ये मतदारांच्या लागल्या होत्या लांबच लांब रांगा

कोदामेंढी :- येथे आज दिनांक 20 नोव्हेंबर बुधवार ला विधानसभा निवडणुकीनिमित्त झालेल्या मतदानात एकूण 3,057 मतदारांपैकी 2295 मतदारांनी आपल्या मतदानाच्या हक्क बजावला .येथे एकूण मतदान 75.56% झाले .येथे एकूण लाडक्या बहिणी (महिला मतदार) 1553 असून पुरुष मतदारांपेक्षा 51 ने जास्त आहे. तसेच 1502 पुरुष मतदारांपैकी 1158 तर 1553 लाडक्या बहिणी पैकी 1137 बहिणींनी मतदान केल्याने ,लाडक्या बहिणी 21 मतांनी पुरुषांपेक्षा मागे राहिल्या.

बुथ क्रमांक 162 मध्ये मतदान केंद्राध्यक्ष राजेश बांते, मतदान अधिकारी तुषार खेरडे, अजय चांदोरे ,अरुणा साखरे, गोंदिया येथील होमगार्ड वाय सी चिक्लोंडे ,बुथ क्रमांक 161 मध्ये मतदान केंद्राध्यक्ष कैलास राठोड, मतदार अधिकारी स्वप्निल आगलावे, भुवनेश्वर बोबडे ,मधुरा बाळसराफ ,महिला पोलीस शिपाई भारती बावणे ,गोंदिया येथील होमगार्ड आर चीक्लोंढे, बूथ क्रमांक 160 मध्ये मतदान केंद्राध्यक्ष रामकृष्ण दिवटे तर मतदान अधिकारी क्रमांक 1 पवार हे माझे नाव बातमीत टाकू नका इतर दोघांचे नाव मतदान केंद्राध्यक्ष दिवटे यांची सांगण्याची इच्छा असतांनाही नाव सांगत नसल्याचे दोनदा विचारले असता पवारांनी उद्धटपणे उत्तर दिले ,तर शर्टाच्या खिशावरील नावाच्या बिल्ला लपविणारा, प्रेस कार्ड दाखवू नये पत्रकारांना उद्धटपणे बोलणारा, नाव न सांगणारा नागपूर ग्रामीणच्या अरोली पोलीस स्टेशन मधील शिपाई अमोल सोनकुसरे असल्याचे नाव न प्रकाशित करण्याच्या अटीवर एका पोलीस विभागातील कर्मचाऱ्यांनी सांगितले व याच बूथ मध्ये बुथ क्रमांक 161व 162 च्या तुलनेत मतदाराच्या दुपारी अडीचच्या दरम्यान लांबच लांब रांगा दिसत होत्या, त्यामुळे येथे येणारे मतदारांना त्रास होत असल्याचे तेथे रांगेत उपस्थित असलेल्या काही मतदारांनी नाव न प्रकाशित करण्याच्या अटीवर सांगितले. तर बूथ क्रमांक 161 व 162 मध्ये येणारे मतदार बूथ मध्ये गर्दीच नसल्याने, रांगच नसल्याने ,लगेच आले की लगेच जात होते .त्यामुळे त्या बूथ मध्ये मतदारांना मतदान करताना कोणताही त्रास झालेला नाही व ते बूथ क्रमांक 160 प्रमाणे त्रासलेही नाही. तसेच बुथ क्रमांक 160 व 162 मध्ये महिला शिपाई नव्हत्या, हे विशेष!.

बुथ क्रमांक 160 मधील नाव न सांगणारे येथील मतदान अधिकारी व पोलीस कर्मचारी कर्मचाऱ्यांच्या येथील नियुक्ती बाबत तर काही गडबड घोटाला तर नाही ना ?या शंकेला पेव फुटले आहे. अरोली पोलीस स्टेशनचे ठाणेदार स्नेहल राऊत व राजस्थान येथील बंदूकधारी शर्टाच्या बिल्ल्यावर फक्त गेंद लाल लिहिलेले व त्यांच्या सांगण्यानुसार ते कॉन्स्टेबल असल्याने, कॉन्स्टेबल गेंदलाल व सहकाऱ्यांनी मतदान केंद्रावर व परिसरात बंदोबस्त व रहदारीस शिस्त लावण्यासाठी तैनात दिसले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

महाराष्ट्रात 'मविआ'च सत्तेत येणार - हेमंत पाटील

Thu Nov 21 , 2024
– भाजप सर्वात मोठा पक्ष; सत्तास्थापनेचे स्वप्न मात्र भंगणार मुंबई :- राज्याच्या राजकारणात गेल्या काही वर्षांमध्ये राजकीय नितिमत्तेचा झालेल ऱ्हास आणि सत्तास्थापनेसाठी करण्यात आलेले प्रयोग मतदारांना रूचलेला नाही.विधानसभा निवडणुकीत मतदान करतांना मतदारांनी ही अनुभव गाठीशी ठेवत यंदा मतदान केल्याने महाविकास आघाडी सत्तेत येईल, असे भाकित इंडिया अगेन्स्ट करप्शनचे (आयएसी) राष्ट्रीय अध्यक्ष आणि ओबीसी नेते हेमंत पाटील यांनी गुरूवारी (ता.२१) व्यक्त […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com