उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची कोराडी मंदिरासह विविध दुर्गादेवी मंडळांना भेट

नागपूर :-  उपमुख्यमंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज कोराडी येथील मंदिरात श्री महालक्ष्मी जगदंबा देवी तसेच शहरातील विविध दुर्गादेवी मंडळांना भेट देवून देवीचे दर्शन घेतले. यावेळी दुर्गादेवी मंडळांकडून त्यांचे शाल व श्रीफळ देवून स्वागत करण्यात आले.

फडणवीस यांनी सिरसपेठ येथील शारदीय नवरात्रोत्सव, उज्वल नगर सांस्कृतिक मंडळ, सोमलवाडा जय दुर्गा उत्सव मंडळ, धंतोली येथील द बंगाली असोसिएशन दुर्गा पूजा उत्सव, गोरेवाडा येथील शिवाजी दुर्गा उत्सव मंडळ, सिंधू महाराज गरबा महोत्सव जरीपटका, गोळीबार चौक जागरण कार्यक्रम, लकडगंज येथील कच्छ पाटीदार समाज, क्वेटा कॉलनी येथील नवरात्र महोत्सव मंडळ व दैनिक भास्कर गरबा उत्सव या मंडळांना भेट देत देवीची आरती केली व दर्शन घेतले.

यावेळी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांसोबतच भाविक भक्तांनी देखील उपमुख्यमंत्र्यांसोबत अनेक ठिकाणी छायाचित्र काढण्यासाठी गर्दी केली. विविध मंडळाच्या पदाधिकाऱ्यांशी त्यांनी यावेळी संवाद साधला.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

भिमराव ते बाबासाहेब हा जडणघडणीचा प्रवास सामाजिक न्याय खाते उलगडणार - ना रामदास आठवले

Tue Oct 24 , 2023
– चित्रपट वेबसीरीज प्रकल्पास कुठलाही निधी कमी पडू देणार नाही नागपूर :- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना सहकार्य केलेले दादाजी केळूसकर, सुरबा नाना टिपणीस, राजर्षी शाहू महाराज, बडोदा नरेश सयाजीराव गायकवाड यांचा डॉ. बाबासाहेब आंबेडकारांशी असलेला सहवास आणि त्यातून दिसून आलेला सोशल इंजिनियरींग या उपक्रमामधे दिसून येणार आहे. यासाठी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भिमराव ते […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com