उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला अर्थसंकल्प पूर्व आढावा

मुंबई : उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री देवेंद्र फडणवीस हे आर्थिक वर्ष २०२३-२४ चा राज्याचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. यासंदर्भात विविध विभागांच्या मागण्यांची तरतूद व पूर्ण केलेल्या कामांचा त्यांनी आज आढावा घेतला. यावेळी पुढील वार्षिक योजनांच्या मागण्यासंदर्भात त्यांनी विस्तृत चर्चा केली. विभागाच्या नाविन्यपूर्ण व महत्त्वाच्या योजना पूर्ण करण्याच्या अनुषंगाने त्यांनी संबंधितांना सूचना केल्या.           वार्षिक योजना सन २०२३-२४ ची आखणी संदर्भात मंत्रालयीन विभागस्तरीय बैठकीचे आयोजन सह्याद्री अतिथीगृह येथे करण्यात आले होते. यावेळी पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग, ग्रामविकास व पंचायत राज, क्रीडा व युवक कल्याण, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये, अन्न व औषध प्रशासन, फलोत्पादन, रोजगार हमी योजना, राज्य उत्पादन शुल्क, इतर मागास बहुजन कल्याण, सहकार, महिला व बालविकास, कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता तसेच पर्यटन या विभागांच्या कामाचा व मागण्यासंदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आढावा घेतला.

पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, ग्रामविकास व पंचायत राज, क्रीडा व युवक कल्याण, वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन, फलोत्पादन व रोजगार हमी योजना मंत्री संदीपान भुमरे, महिला व बालविकास, कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता, पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा, सहकार, इतर मागास बहुजन कल्याण विभाग मंत्री अतुल सावे यांच्यासह राज्य उत्पादन शुल्क, नियोजन आणि संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

परकीय गुंतवणुकीसाठी उद्योजकांना सर्वतोपरी सहकार्य करणार - उद्योगमंत्री उदय सामंत

Sat Feb 4 , 2023
मुंबई : महाराष्ट्र हे उद्योगस्नेही राज्य असून परकीय गुंतवणुकीसाठी उद्योजकांना सर्वतोपरी सहकार्य करण्याची राज्य शासनाची भूमिका असल्याची माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली. जर्मनीच्या शिष्टमंडळासमवेत उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच मुंबई येथे द्विपक्षीय चर्चा झाली. यावेळी त्यांनी जर्मनीच्या शिष्टमंडळाचे स्वागत केले. मंत्री उदय सामंत म्हणाले की, जर्मनी आणि भारताचे द्विपक्षीय संबंध अत्यंत सौहार्दपूर्ण असे राहिलेले आहेत. जर्मनी हा युरोपातील […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!