अहमदनगर शहराचे नाव ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर’ करण्याचा निर्णय,अहिल्यादेवींचे विचार, कार्य पुढे घेऊन जाणारा, लोकप्रतिनिधींना प्रेरणा देणारा -उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रतिक्रिया

– अहमदनगर शहराचे नाव ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर’ केल्यानेअहमदनगर शहर, जिल्हा आणि महाराष्ट्रवासियांच्या इच्छेची पूर्तता -उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रतिक्रिया

मुंबई :- अहमदनगर शहराचे नाव ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर’ करण्याचा राज्य मंत्रिमंडळाने घेतलेला निर्णय पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव करणारा, त्यांचे विचार, कार्य, स्मृती पुढे घेऊन जाणारा, लोकप्रतिनिधींना चांगले कार्य करण्यासाठी प्रेरणा देणारा आहे. यानिर्णयाने अहमदनगर शहरवासियांची, जिल्हावासियांची, महाराष्ट्रातील तेरा कोटी नागरिकांची महत्वाची इच्छा पूर्ण झाली आहे. हा निर्णय होण्यात आमदार सर्वश्री संग्राम जगताप, दत्तामामा भरणे, आशुतोष काळे, नितीन पवार या लोकप्रतिनिधींनी महत्वाची भूमिका बजावली. त्या सर्वांचे तसेच समस्त महाराष्ट्रवासियांचे मी मनापासून अभिनंदन करतो, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अहमदनगर शहराचे नाव ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर’ करण्याच्या निर्णयाचे स्वागत केले असून मुख्यमंत्री तसेच राज्य मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांचे आभार मानले आहेत.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

बजाज आलियांज ने वर्धा में एक नया ग्राहक-केंद्रित कार्यालय खोलकर महाराष्ट्र में अपनी उपस्थिति मजबूत की

Wed Mar 13 , 2024
वर्धा :- भारत की अग्रणी प्राइवेट जनरल इंश्योरेंस कंपनियों में से एक बजाज आलियांज जनरल इंश्योरेंस ने महाराष्ट्र के वर्धा में अपना नया कार्यालय खोल लिया है। वर्धा के विरासत और इसके चहुंमुखी विकास में योगदान देने वाली एक कंपनी के रूप में बजाज आलियांज जनरल इंश्योरेंस का यह कदम इसके रणनीतिक विस्तार का हिस्सा है जो बीमा के अंतर […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com