ज्येष्ठ निवेदक अमिन सयानी यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांची श्रद्धांजली

– ज्येष्ठ निवेदक अमिन सयानी यांच्या निधनाने रेडीओच्या इतिहासातील सुवर्णअध्याय संपला – उपमुख्यमंत्री अजित पवार यांची श्रद्धांजली

– रेडिओच्या आवाजाचा अनभिषिक्त सम्राट हरपला – उपमुख्यमंत्री अजित पवार*

*भारतीय कला, सांस्कृतिक क्षेत्राची कधीही भरुन न निघणारी हानी – उपमुख्यमंत्री अजित पवार*

मुंबई :- “रेडिओच्या आवाजाचा अनभिषिक्त सम्राट, ज्येष्ठ निवेदक अमिन सयानी यांच्या निधनाने भारतीय रेडिओच्या सांगितिक इतिहासातील सोनेरी अध्याय संपला आहे. रेडीओ हेच माहिती व मनोरंजनाचे एकमेव साधन होते त्या काळात अमिन सयानींनी १९५२ ते १९९४ अशी तब्बल बेचाळीस वर्षे रेडीओवर गीतमाला सादर केली. त्यांच्या शैलीदार, रसाळ निवेदनाने रेडीओवरील गीतांची गोडी कैकपटीने वाढवली. संगीतरसिकांच्या कितीतरी पिढ्यांचे कान त्यांच्या निवेदनानं तृप्त केले. त्यांनी रेडीओवर घेतलेल्या गायक, गीतकार संगीतकारांच्या मुलाखती हा भारताच्या सांगितिक वाटचालीचा अमूल्य ठेवा आहे. त्यांच्यासारखा निवेदक भारतीय रेडीओवर असणं आणि त्याचा आवाज ऐकायला मिळणं, हा अवर्णनीय आनंद होता. त्यांचं निधन ही भारतीय कला, सांस्कृतिक क्षेत्राची कधीही भरुन न निघणारी हानी आहे. मी अमिन सयानी साहेबांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.” अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ज्येष्ठ निवेदक अमिन सयानी यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त करुन आपल्या शोकभावना व्यक्त केल्या.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

बसपाची नागपूर शहर कार्यकारीनी अध्यक्ष प्रकाश गजभिये, महासचिव चंद्रशेखर कांबळे 

Wed Feb 21 , 2024
नागपूर :- बहुजन समाज पार्टी महाराष्ट्र प्रदेशचे महासचिव व विदर्भ झोनचे इन्चार्ज एड सुनील डोंगरे, महाराष्ट्र प्रदेशचे सचिव व विदर्भ झोन इन्चार्ज पृथ्वीराज शेंडे, महाराष्ट्र प्रदेश चे सदस्य व विदर्भ झोन चे इंचार्ज इंजि दादाराव उईके, तसेच नागपूर जिल्हाध्यक्ष संदीप मेश्राम यांनी प्रदेश बसपाच्या विभागीय कार्यालयात नागपूर शहर बसपाची कार्यकारिणी जाहीर केली. नागपूर शहर प्रभारी शादाब खान व विकास नारायने, […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!