उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून राज्यातील जनतेला नववर्षाच्या शुभेच्छा

 मुंबईदि. 31 :- उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील जनतेला 2022 या नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. येणारे नवीन वर्ष राज्यातील जनतेला विकासाच्या नवनवीन संधी उपलब्ध करून देणारेमहाराष्ट्राला सर्वांगीण प्रगतीच्यासंपूर्ण कोरोनामुक्तीच्या वाटेवर घेऊन जाणारे ठरेलअसा विश्वासही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात व्यक्त केला आहे.

            उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या शुभेच्छा संदेशात म्हणतात कीमावळते 2021 वर्ष अनेक संकटांनाआव्हानांना घेऊन आले. मात्रमहाराष्ट्रवासियांची एकजूट आणि निर्धाराच्या बळावर आपण या आव्हानांचा यशस्वी मुकाबला केला. महाराष्ट्राची ही एकजूट यापुढेही कायम ठेवायची आहे. राज्य आणि देशासमोर ओमायक्रॉनचा धोका आणि कोरोनारुग्णांची वाढती संख्या हे नवीन आव्हान नववर्षाच्या सुरुवातीलाच उभे राहिले आहे. कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करून आपण या संकटावर लवकरच विजय मिळवूअसा विश्वासही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला आहे.

            कृषीउद्योग व्यापारशिक्षणसहकारकलाक्रीडासाहित्यसंस्कृतीसामाजिक सुधारणा अशा अनेक क्षेत्रात महाराष्ट्र नेहमीच देशात अव्वल राहिला आहे. महाराष्ट्राचे हे अव्वल स्थान कायम ठेवण्यासाठी आपण सर्वांनी पुन्हा एकदा दृढसंकल्प होऊयाअसे सांगतानाच  नववर्षाचे स्वागत उत्साहाने मात्र आरोग्यभान राखत संयमाने कराअसे आवाहनही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

News Today 24x7

Next Post

जेई लस म्हणजे पुढच्या पिढीसाठी कवच कुंडल !

Fri Dec 31 , 2021
-डॉ. मंगेश गुलवाडे : जॅपनीज एन्सेफलाइटिस प्रतिबंधात्मक लसीच्या जनजागृती पालकसभा चंद्रपूर, ता. ३१ : जपानीज एन्सेफलिटीस आजारामुळे मुलांच्या मेंदूवर विपरीत परिणाम होतो. त्यामुळे प्रतिबंधात्मक लसीकरण म्हणजे पुढच्या पिढीसाठी कवच कुंडल होय. पालकांनी मनात कोणतीही शंका तीन जानेवारीपासून सुरु होणाऱ्या लसीकरण मोहिमेत १ ते १५ वर्ष वयोगटातील बालकांचे लसीकरण करू घ्यावे, आयएमएचे अध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे यांनी केले. जॅपनीज एन्सेफलाइटिस प्रतिबंधात्मक लसीच्या […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!