बेकायदेशीर अग्नीशस्त्र व माउजर शस्त्र बाळगणाऱ्या हद्दपार इसमांना केले अटक

नागपूर :- स्थानिक गुन्हे शाखेचे पथक रामटेक उपविभागात पेट्रोलींग करीत असता गुप्त बातमीदारांकडुन माहिती मिळाली की, नागपूर जिल्हा येथुन हद्दपार असलेला प्रफुल्ल मोरेश्वर चाफले, रा. नंदापुरी रामटेक याचे जवळ देशी बनावटीचे माउजर असुन तो नेहमी त्याच्याजवळ असलेल्या पांढऱ्या रंगाची महिंद्रा XUV 500 गाडी क्र. MH-33 V-2111 मध्ये सोबत बाळगतो. तो महिंद्रा XUV 500 गाडी घेवुन कन्हान कडुन रामटेककडे रात्रीच्या वेळी येणार आहे. अशा विश्वसनीय खबरे वरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मनसर ते रामटेक रोडवर प्रोव्हीडेन्स शाळेसमोर नाकाबंदी केली असता महिंद्रा XUV 500 गाडी क्र. MH-33 V-2111 चा चालक आरोपी नामे प्रफुल्ल मोरेश्वर चाफले, वय ३२ वर्ष, रा. नंदापुरी रामटेक यास थांबवुन वाहनाची झडती घेतली असता कोणतेही संशयास्पद शस्त्र किंवा अग्नीशस्त्र माउजर मिळुन आले नाही. त्यास विश्वासात घेवुन अधिक विचारपुस केली असता त्याने सांगितले की, ६ ते ८ महिन्यापुर्वी प्रफुल चाफले व त्याचा मित्र अक्षय यादव रा. कन्हान दोघेही मिळुन मध्यप्रदेश येथील बैतूल या ठिकाणी राहणारा राजेश उर्फ पंडीतजी याचे जवळुन २५,०००/- रु. मध्ये एक लोखंडी स्टील पॉलीश असलेला माउजर व काडतुस किंमती १०००/- रू. मध्ये खरेदी केला होता. प्रफुल चाफले याने अग्नीशस्त्र व माउजर हे अक्षय यादव रा. कन्हान याचे जवळ असल्याचे सांगितले. प्रफुल चाफले याचे सांगणेवरून अक्षय यादव रा. कन्हान यास ताब्यात घेवुन प्रफुल चाफले यानी त्याचेकडे दिलेले अग्नीशस्त्र व माउजर बाबत विचारले असता अग्नीशस्त्र व माउजर व एक राउंड हे त्याचा मित्र पियुष जांगडे याला दिल्याचे सांगितले. यावरून दोघांना ताब्यात घेवुन रामटेक येथील पानठेला चालक पियुष उर्फ प्रफुल दुर्गाप्रसाद जांगडे, वय ३२ वर्ष, रा. रामटेक ता. रामटेक यास अग्नीशस्त्र व माउजर वावत विचारपुस केली असता त्याने त्याचा मित्र अक्षय पिंपळकर रा. रामटेक यास दिल्याचे सांगितले. अक्षय पिंपळकर रा. रामटेक यास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मोठ्या शिताफीने त्याचा शोध घेवुन गवळकनाला शिवार रोडवर पथकाने नाकाबंदी करून महिंद्रा स्कॉर्पिओ क्र. MH 29, P-0789 चा चालक आरोपी अक्षय पिंपळकर, वय ३० वर्ष, रा. गवळक नाला रामटेक ता. रामटेक यास पियुग जांगडे याने दिलेले अग्नीशस्त्र व माउजर बाबत विचारपुस केली असता उडवाउडविचे उत्तरे देवु लागला. त्यास विश्वासात घेवुन अधिक विचारपुस केली असता सांगितले की, पियुश जांगडे याचे कडुन घेतलेले अग्नीशस्त्र हे त्याचे स्कार्पिओ गाडीचे चालक सिटच्या सिट कव्हर च्या मागील चैनमध्ये ठेवलेले असल्याचे सांगितले वरून त्याचे ताब्यातून विनापरवाना एक देशी बनावटीचे अग्नीशस्त्र आणि ०१ जिवंत काडतूस मिळून आल्याने त्यांचेविरुद्ध पो.स्टे. रामटेक येथे कलम ५, २५ भारतीय हत्यार कायदा सहकलम १४२ म.पो.का. अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून आरोपी इसमाकडून १) एक देशी बनावटीचे माउजर किंमती २५,०००/- रू., २) एक जिवंत काडतूस किंमती १०००/- रु. ३) एक XUV 500 क्र. MH33 V-2111 किंमती १०,०००००/- रू.,४) एक महिंद्रा स्कॉर्पिओ क्र. MH 29, P-0789 किंमती ७०००००/- रू. ५) एकुण ०३ मोबाईल किंमती ६५०००/- रू. असा एकूण १७.९१०००/- रू. चा मुद्देमाल आरोपितांकडून जप्त करण्यात आला. चारही आरोपीतांना अटक करण्यात आली असुन माउजर ज्याचे कडुन घेतली त्याचा शोध सुरू आहे. सर्व आरोपीतांचा दि. ०२/०६/२०२४ पावेतो मा. न्यायालयाकडुन पीसीआर घेण्यात आलेला आहे.

सदरची कार्यवाही ही पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण हर्ष ए. पोद्दार (भापोसे), अपर पोलीस अधीक्षक रमेश धुमाळ यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे, सपोनि किशोर शेरकी, पो.हवा. रोशन काळे, राजेंद्र रेवतकर, आशिष मुंगळे, नितेश पिपरोदे, शंकर मडावी, उमेश फुलवेल, किशोर वानखेडे, नापोशी विरेंद्र नरड, विपीन गायधने यांनी पार पाडली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

अवैध रेतीची चोरटी वाहतुक करणाऱ्या आरोपीविरूद्ध गुन्हा नोंद

Fri May 31 , 2024
– पोलीस स्टेशन रामटेक ची कारवाई रामटेक :- पोलीस स्टेशन रामटेक येथील स्टाफ यांना गोपनीय माहीती मिळाली की, एक इसम आपले टिप्पर वाहन क्र. एम एच ४०/२११२ ने अवैधरीत्या विनापरवाना रेतीची चोरटी वाहतुक करीत आहे. अशा मिळालेल्या माहितीवरून पोलीस स्टेशन रामटेक येथील स्टाफ यांनी किमया हॉस्पिटल रामटेक येथे नाकाबंदी केली असता घटनास्थळावर टिप्पर वाहन क्र. एम एच ४०/२११२ येतांना दिसले. […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com