नागपूर : विभागीय लोकशाही दिनात आज जुन्या दहा तक्रारींवर चर्चा करुन केलेल्या कार्यवाहीचा आढावा घेण्यात आला. विभागीय लोकशाही दिनात आज अर्जदाराकडून एकही तक्रार प्राप्त झाली नाही. उपायुक्त आशा पठाण यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभाकक्षात विभागीय लोकशाही दिन घेण्यात आला. जुन्या 10 तक्रारींमध्ये नागपूर जिल्हाधिकारी कार्यालयाची 5 प्रकरणे, महानगरपालिकाचे 1 प्रकरण, सावनेर उपविभागीय कार्यालय 1, चंद्रपूर जिल्हा परिषद 1 , चंद्रपूर महानगरपालिका 1, चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालय एक प्रकरणांचा समावेश आहे.
या लोकशाही दिनाला विशेष पोलीस महानिरीक्षक, नागपूर परीक्षेत्र, नागपूर सुधार प्रन्यास, महानगरपालिका, जिल्हाधिकारी, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे), महावितरण विभाग, विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था, कामगार आयुक्त कार्यालय, भूमी अभिलेख कार्यालय, जिल्हा परिषद तसेच इतर विभागाचे अधिकारी उपस्थित होते.