नागपूर :- महाराष्ट्र शासनाच्या ३० डिसेंबर १९९९ च्या शासन निर्णयाप्रमाणे जनतेच्या तक्रारींचे निराकरण करण्याच्या दृष्टीने दर महिन्यातील पहिला सोमवार ‘लोकशाही दिन’ म्हणून आयोजित करण्यात येतो. त्यानुसार 3 ऑक्टोबर २०२२ रोजी सकाळी १० वाजता मनपा मुख्यालयातील डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती स्थायी समिती सभागृहामध्ये लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले आहे.
लोकशाही दिनानिमित्त विभागीय आयुक्त नागपूर विभागाला प्राप्त तक्रारींचा निपटारा सुद्धा यावेळी करण्यात येणार आहे. त्यामुळे मनपाचे सर्व कक्ष प्रमुख, सहायक आयुक्तांनी स्वतः उपस्थित राहण्याचे निर्देश मनपा आयुक्तांनी दिले आहे. तसेच संबंधित नागरिकांनी आपल्या तक्रारींसह आयोजित वेळेत उपस्थित राहावे, असे आवाहन नागपूर महानगरपालिकेतर्फे करण्यात आले आहे.