मनपात ६ नोव्हेंबर रोजी लोकशाही दिन

नागपूर :- नागपूर महानगरपालिकेच्या केंद्रीय कार्यालयात सिव्हिल लाईन येथे सोमवार ६ नोव्हेंबर रोजी लोकशाही दिनाचे सकाळी १० वाजता आयोजन करण्यात आले आहे.

महाराष्ट्र राज्य शासनाच्या ३० डिसेंबर १९९९ च्या शासन निर्णयाप्रमाणे जनतेच्या तक्रारींचे निराकरण करण्याच्या दृष्टीने दर महिन्यातील पहिला सोमवार ‘लोकशाही दिन’ म्हणून आयोजित करण्यात येतो. त्यानुसार सोमवार दिनांक ६ नोव्हेंबर २०२३ रोजी सकाळी १० वाजता मनपा मुख्यालयातील डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती स्थायी समिती सभागृह येथे लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले आहे. लोकशाही दिनानिमित्त संबंधित नागरिकांनी आपल्या तक्रारींसह आयोजित वेळेत उपस्थित राहावे, असे आवाहन नागपूर महानगरपालिकेतर्फे करण्यात येत आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

आदिवासी हलबा समाज विकास संस्‍थेतर्फे कोजागिरी कार्यक्रम संपन्‍न

Thu Nov 2 , 2023
नागपुर :-आदिवासी हलबा समाज विकास संस्‍थेतर्फे राधाकृष्‍ण नगर, वाठोडा रिंग रोड, नागपुर येथे आयोजित कोजागिरी कार्यक्रम संपन्‍न झाले. हया कार्यक्रमात ‘‘राष्‍ट्रीय आदिम कृती समितीच्‍या’’ वतीने नंदा पराते व अभय धकाते यांनी आंदोलना संबंधी संपूर्ण माहिती दिली व आंदोलनामध्‍ये आपल्‍या समाजातील प्रत्‍येक घटकातील लोकांनी सक्रियतेने भाग घेण्‍याचेही आव्‍हान केले. आदिवासी हलबा समाज विकास संस्‍थेचे अध्‍यक्ष भास्‍कर चिंचघरे, सचिव फनिभरे, वाकोडीकर व […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com