मनपात १ जानेवारी रोजी लोकशाही दिन

नागपूर :- नागपूर महानगरपालिकेच्या केंद्रीय कार्यालयात सिव्हिल लाईन येथे १ जानेवारी २०२४ रोजी लोकशाही दिनाचे सकाळी १० वाजता आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य शासनाच्या ३० डिसेंबर १९९९ च्या शासन निर्णयाप्रमाणे जनतेच्या तक्रारींचे निराकरण करण्याच्या दृष्टीने दर महिन्यातील पहिला सोमवार ‘लोकशाही दिन’ म्हणून आयोजित करण्यात येतो. त्यानुसार सोमवार दिनांक १ जानेवारी २०२४ रोजी सकाळी १० वाजता मनपा मुख्यालयातील डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती स्थायी समिती सभागृह येथे लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले आहे. लोकशाही दिनानिमित्त संबंधित नागरिकांनी आपल्या तक्रारींसह आयोजित वेळेत उपस्थित राहावे, असे आवाहन नागपूर महानगरपालिकेतर्फे करण्यात येत आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

शिक्षणाधिकारी राजेश कंकाळ यांची 'दिलखुलास’ कार्यक्रमात मुलाखत

Wed Dec 27 , 2023
मुंबई :- माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमात बृहन्मुंबई महानगरपालिकेचे शिक्षणाधिकारी राजेश कंकाळ यांच्या मुलाखतीचा तिसरा भाग गुरुवार दि. 28 डिसेंबर 2023 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व ‘न्यूज ऑन एआयआर’ या मोबाईल ॲपवर प्रसारित होणार आहे. शैक्षणिक प्रशासनात उल्लेखनीय योगदानासाठी केलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमाबाबद्दल सन २०२२-२३ करिता राष्ट्रीय शैक्षणिक योजना एवं प्रशासन संस्था (एनआयईपीए), […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com