1 जुलै रोजी लोकशाही दिन

गडचिरोली :- माहे जुलै महिन्यातील लोकशाही दिनाचे आयोजन सोमवार दिनांक 1 जुलै 2024 रोजी दुपारी 3.00 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात करण्यात आले आहे.

सदर सभेच्या दिवशी तक्रार अर्ज स्विकारण्याची वेळ दुपारी 2.00 ते 3.00 वाजेपर्यत राहील आणि सभेला 3.00 वाजता सुरुवात होईल, ज्या तक्रारदारांना लोकशाही दिनात तक्रार अर्ज दाखल करावयाचा असल्यास, त्यांनी तालुका स्तरावरील लोकशाही दिनात दाखल केलेल्या तक्रारीचे निराकरण होवून प्राप्त झालेल्या अहवालावर समाधान न झाल्यास तालुका स्तरावरील प्राप्त अहवाल व टोकन क्रमांक जोडून जिल्हास्तरावर दिनांक 1 जुलै 2024 रोजी होणाऱ्या लोकशाही दिनात तक्रार अर्ज विहित नमुन्यात (प्रपत्र-1 अ ते 1 ड) दोन प्रतित दाखल करणे आवश्यक राहील. तसेच तक्रार/ निवेदन वैयक्तिक स्वरुपाची असावी. अन्यथा अर्ज विचारात घेण्यात येणार नाही. असे निवासी उपजिल्हाधिकारी विवेक सोळूंके यांनी कळविले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्काराकरीता अर्ज आमंत्रित

Fri Jun 28 , 2024
गडचिरोली :- शिक्षण हा समाजाच्या सर्वांगीण विकासाचा पाया आहे. समर्पित वृत्तीने काम करणाऱ्या शिक्षकांमुळेच समाज आणि राज्याचा तसेच राष्ट्राचा विकास होता. अशा समर्पित वृत्तीने काम करणाऱ्या शिक्षकांना राज्य शासनाच्या वतीने दरवर्षी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्काराने गौरविले जाते. शैक्षणिक वर्ष 2023-24 साठी हे पुरस्कार वस्तुनिष्ठ निकषाद्वारे प्रदान करण्यात येणार आहेत. पुरस्कारासाठी आवेदने सादर करु इच्छिणाऱ्या प्राथमिक, माध्यमिक/ उच्च […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!