अमरदिप बडगे, प्रतिनिधी
महिला कर्मचारी हि मोठ्या संख्येत सहभागी
मागण्या पूर्ण न झाल्यास बेमुदत काम बंद आंदोल करण्याचा इशारा
गोंदिया :- राज्यातील सरकारी-निमसरकारी-शिक्षक -शिक्षकेत्तर कर्मचा-यांना हक्काची जुनी परिभाषित पेन्शन योजना लागु करण्यात यावी या मागणीला घेवून आवाज बाईक रॅलीचे काढण्यात आली. असुन उपविभागीय अधिकारी कार्यालय पासून ते जिल्हा अधिकारी कार्यालय पर्यंत रॅली काढण्यात आली. असुन जुनी पेन्शन लागू करण्यात यावी याचे निवेदन जिल्हा अधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री यांना देण्यात आले तर मागणी पूर्ण न झाल्यास बेमुदत काम बंद आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. ता या बाईक रॅली मध्ये हजारोच्या संख्येने शासकीय कर्मचारी व शिक्षक सहभागी झाले होते. तर महिला कर्मचारी व शिक्षका हि मोठयसंखेने या बाईक रॅली मध्ये सहभागी झाल्याचे पहायला मिळाले.
अलीकडेच राजस्थान छत्तीसगड गोवा झारखंड या राज्यांनी तेथील राज्य सरकारी कर्मचा-यांना नवीन पेन्शन योजना रद्य करून जुनी परिभाषित पेन्शन योजना लागु केली आहे. त्या अनुषंगाने राज्याती हि जुनी पेन्स लागू करण्यात यावी यासाठी बाईक रॅली काढण्यात आली हि बाईक रॅली नवीन प्रशासकिय परिसरातुन सुरू करण्यात आली असुन जिल्हाधिकारी कार्यालया पर्यंत आली असुन तिथे मुख्यमंत्री यांचे नावे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले.