– हुबेहूब जंगलाची अनुभूती देणारा अंडर पास ची मागणी
कोंढाळी /बाजारगाव :- नागपूर जिल्ह्यात राष्ट्रिय महाराष्ट्र क्रं 06/53/एशियन हायवेज् क्रं 46 महामार्गावरील कोंढाळी -कळमेश्वर वनपरिक्षेत्र चे बाजागाव उपवन परिक्षेत्रातूनजाणारे राष्ट्रिय महामार्गावर काम पूर्ण झाले आहे. पण या महामार्गावर बोर व्याघ्र प्रकल्पातून कोंढाळी /कळमेश्वर भागातील वन्य प्राण्यांना एक दुसऱ्या बाजूला सुरक्षितपणे जाता यावे यासाठी कमित कमी एका ठिकाणी वाइल्ड लाइफ ओव्हर पास आणि दोन ठिकाणी अंडर पास तयार करणे गरजेचे होते, मात्र ते केले गेले नाहीत, असे सामाजिक कार्यकर्ते दुर्गा प्रसाद पांडे यांनी सांगितले.
मुंबई / कच्छ जिल्ह्यातून कोलकता पर्यंत हजारो किलोमीटर लांबीचा हा महामार्ग असून, बाजार गाव, सातनवरी, व जुनापानी भागातील वनक्षेत्रातून वाघ ,बिबट व अन्य वन्य प्राणी मेटिंग साठी महामार्ग ओलांडून ये-जा करतात. या महामार्गाचे दक्षिण भागातून उत्तरेकडे महामार्ग ओलांडताना व ये- जा करण्यासाठी वन्य प्राण्यांना अडथळा येऊ नये, विना व्यत्यय त्यांचा वावर व्हावा, यासाठी या महामार्गावर निदान एक ‘वाइल्ड लाइफ ओव्हर पास’ व दोन ‘अंडर पास’ तयार करणे फारच गरजेचे आहेत. यापैकी बाजार गाव-पाचनवरी (सातनवरी) , रिंगणाबोडी नाला व जुनापानी जवळ ‘वाइल्ड लाइफ अंडर पास’ ची गरज आहे.
हुबेहूब जंगलाची अनुभूतीवन्य प्राण्यांचा वावर लक्षात घेऊन वनविभागाने सुचविलेल्या ठिकाणी हे ओव्हर पास व अंडर पास तयार केले गेले पाहिजे होते.आता तरी हुबेहूब जंगलातील रस्त्यांची अनुभूती देणारे ओव्हर पास व अंडर पासल तयार करण्यासाठी केंद्रीय महामार्ग मंत्रालय, राज्य व केंद्रिय वन पर्यावन , सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन व सुरक्षाच विभागाचे मंत्री अधिकारी यांनी या भागाची प्रत्यक्ष घटनास्थळ पाहणी करून योग्य तो निर्णय घ्यावा अशी मागणी कोंढाळी चे माजी उप सरपंच स्वप्निल व्यास ,राकेश असाटी यांनी केली आहे .