नागपुर : मोरया फाउंडेशनच्या वतीने शहरातील बाजारपेठ, वर्दळीच्या ठिकाणी महिलांसाठी शौचालय नाही, काही ठिकाणी शौचालयाला दरवाजे नाहीत, ती तुटलेल्या अवस्थेत आहे. काही महिला शौचालय मधे असामाजिक तत्वाचे लोकं येऊन बसतात, पाण्याची नीट व्यवस्था नाही या सर्व कारणामुळे महिला अश्या शौचालयात जाऊ शकत नाही. तेव्हा वर्दळीच्या ठिकाणी बाजारपेठेत ई टॉयलेट प्रणाली सुरु करावी. आज आपलं शहर स्वच्छ व सुंदर नागपूर म्हणून गणल्या जात परंतु शौचालय बघून अजुनही आपण ग्रामीण मधे राहत असल्याची जाणीव निर्माण होते. G-20 अंतर्गत आपल्या नागपुर शहराचे सौंदर्यीकरण झाले आहे. तेव्हा महिलांचे स्वच्छतागृह सुद्धा सुंदर आणि स्वच्छ दिसायला पाहिजेत, त्यामुळे महिलांचे आरोग्य सुदृढ राहील. या आमच्या मागणीची अमलबजावणी लवकरात लवकर करण्यात यावी. हिच आमची महाराष्ट्र शासनाला मागणी आहे. यावेळी जिल्हाधिका-यांनी बर्डी, इतवारी, महाल, सक्करदरा आणि जरीपटका या एरियात अमलबजावणी करतो असे आश्वासन दिले. मोरया फाउंडेशनच्या संस्थापिका रजनी अविनाश चौहाण, माधुरी इट्टेडवार, स्विटी मांडवगडे, कोमल पिसार आदींची उपस्थिती होती.
स्त्रियांसाठी नागपुर शहरातील संपुर्ण मार्केटात स्वच्छ प्रसाधन गृहाची, ई टॉयलेटची व्यवस्था करण्याची मागणी
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com