नागपूर :-बिहारच्या धरतीवर महाराष्ट्रातही जातीनिहाय जनगणना करावी ! ओबीसी, विजेएनटी विद्यार्थ्यांसाठी 72 वसतीगृहे तात्काळ सुरू करावेत. आणि 21 हजार 600 विद्यार्थ्यांसाठी सावित्रीबाई फुले आधार योजना तात्काळ सुरू करावी. असे पत्रकारांना उमेश कोर्राम यांनी ओबीसी युवा अधिकार मंच च्यावतीने सांगितले गेले.
पूर्व विदर्भातील सात जिल्ह्यातील ओबीसी समुदायातून जवळपास एक लाख पोस्ट कार्ड स्मरण पत्र म्हणून मुख्यमंत्री सचिवालय सिव्हिल लाईन नागपूर यांच्या पत्त्यावर पाठविले जाणार असल्याची माहिती दिली. सोबतच एक लाख सह्यांचे पत्र हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आणि ओबीसी कल्याण मंत्री यांना देण्यात येणार असल्याची माहिती पत्रकारांना दिली.